scorecardresearch

Premium

अभिनय क्षेत्र गाजवणाऱ्या सई ताम्हणकरने युट्यूब चॅनेल का सुरु केलं?, म्हणाली…

सई ताम्हणकरने युट्यूब चॅनेल सुरु करण्याचा निर्णय घेतला, कारण…

sai tamhankar youtube channel
सई ताम्हणकरने केली नवी सुरुवात

सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने मराठीसह बॉलीवूड चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘मिमी’ अशा अनेक चित्रपटांमुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. सईचं बालपण सांगलीत गेलं. पुढे, अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु करण्यासाठी जवळपास २००५ मध्ये अभिनेत्री मुंबईत आली. सांगली ते मुंबई या प्रवासात अनेक वर्ष सई भाड्याच्या घरात राहत होती. आता नुकतंच तिने मुंबईत हक्काचं पहिलं घर घेतलं आहे. याशिवाय सईने नुकतंच तिचं युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे.

हेही वाचा : “तडजोडी कराव्या लागतात”, स्मिता गोंदकरने लग्नाविषयी मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “मला आता…”

Rutuja Gaurav
“तो अत्यंत…,” ऋतुजा बागवेने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेबरोबर काम करण्याचा अनुभव
marathi actress Hemangi kavi
“तू हिंदी चित्रपट, सीरिजमध्ये काम का करत नाहीस?” हेमांगी कवीने समीर चौघुलेंचा व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर…
ajay purkar
“मराठी लोक…”, ‘पावनखिंड’मधील अभिनेत्याने सांगितले निर्मितीसंस्था सुरु करण्याचे खरं कारण
Shilpa Shetty reveals no big banner cast her
“मोठ्या बॅनरचे चित्रपट कधीच मिळाले नाहीत”, शिल्पा शेट्टीने व्यक्त केली खंत; म्हणाली, “बॉलीवूडमध्ये फक्त…”

आजच्या घडीला एक यशस्वी अभिनेत्री असूनही सई ताम्हणकरने युट्यूब चॅनेल सुरु करण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न तिला अलीकडेच ‘कर्ली टेल्स’च्या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, “कोणतीही पार्श्वभूमी नसताना मी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. मी सतत काहीतरी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. माझ्यासाठी युट्यूब क्षेत्र हे पूर्णपणे नवीन आहे. सुरुवातीला मला युट्यूबबद्दल काहीच माहिती नव्हती.”

हेही वाचा : Video : मिठी मारली अन्…; अनेक वर्षांनी एकत्र दिसले श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर, नेटकरी म्हणाले, “अनन्या…”

“युट्यूब चॅनेल सुरु करण्यासाठी मला माझ्या मित्र-मैत्रिणींनी प्रोत्साहन दिलं. मी खूप चांगल्या पद्धतीने युट्यूब चॅनेल सांभाळू शकेन असा त्यांना विश्वास होता. म्हणून मी माझं स्वत:चं नवीन चॅनेल सुरु करण्याचा निर्णय घेतला. सध्या ‘माय इलेव्हन्थ प्लेस’ ही सीरिज मी सुरु केली आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना मी माझ्या जुन्या घरातून नव्या घरात कशी शिफ्ट होतेय हे पाहायला मिळेल. माझ्या नव्या घराची झलक दिसेल.” असं सई ताम्हणकरने सांगितलं.

हेही वाचा : शिव ठाकरेला VIP रांगेतून लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याची खंत, म्हणाला, “जे लोक काही तास रांगेत थांबलेले असतात…”

दरम्यान, सईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच सई फरहान अख्तर दिग्दर्शित एका नव्या हिंदी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप अभिनेत्रीकडून उघड करण्यात आलेलं नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sai tamhankar reveals why she started her new youtube channel sva 00

First published on: 28-09-2023 at 16:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×