दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून आकाश ठोसरकडे पाहिले जाते. आकाश ठोसरने सैराट या चित्रपटात परश्या ही भूमिका साकारली होती. त्याच्या या पात्रामुळे तो घराघरात पोहोचला. आकाश ठोसर हा लवकरच घर, बंदूक, बिरयानी या चित्रपटात झळकणार आहे. मात्र त्यापूर्वी आकाश ठोसर हा विवाहबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेता आकाश ठोसर हा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आकाश ठोसरच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.आणखी वाचा : “मी तयार, फक्त तिला…” आकाश ठोसरने सांगितली लग्नासाठीची एकमेव अट आकाश ठोसरने शेअर केलेल्या या फोटोत तो मुंडावळ्या बांधून नवरदेवाच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळत आहे. "जमलय बर का…….. यायला लागतय!!! १० दिवस बाकी", असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. त्यामुळे खरंच आकाशचं लग्न ठरलं का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. आणखी वाचा : “तुझं माझं नेटवर्क…” ऋतुजा बागवेच्या बोल्ड फोटोवर ओंकार राऊतची कमेंट, अभिनेत्री म्हणाली “सर्व्हर…” दरम्यान आकाशने शेअर केलेला हा फोटो त्याच्या आगामी चित्रपटासंबंधित आहे. येत्या ७ एप्रिलला त्याचा घर, बंदूक, बिरयानी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यासंबंधितच त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.