दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून आकाश ठोसरला ओळखले जाते. त्याने या चित्रपटात परश्या ही भूमिका साकारली होती. त्यामुळे तो घराघरात पोहोचला. आकाश ठोसर हा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याने नुकतंच मुंडावळ्या बांधून एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या या फोटोवर अभिनेत्री सायली पाटीलने कमेंट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता आकाश ठोसर हा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली आहे. त्यातच आकाशने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तो मुंडावळ्या बांधून नवरदेवाच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळत आहे. “जमलंय बर का…….. यायला लागतय!!! १० दिवस बाकी”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
आणखी वाचा : “जमलंय बर का…” आकाश ठोसर अडकणार विवाहबंधनात? मुंडावळ्या बांधलेला फोटो आला समोर

आकाश ठोसरचा हा फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना त्याचं खरंच लग्न ठरलं का? असा प्रश्न पडला आहे. नुकतंच त्याच्या या फोटोवर अभिनेत्री सायली पाटीलने कमेंट केली आहे. तिने आकाशचा हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. “नवरी तयार आहे”, अशी कमेंट सायलीने केली आहे.

सायली पाटील कमेंट

आणखी वाचा : “मी तयार, फक्त तिला…” आकाश ठोसरने सांगितली लग्नासाठीची एकमेव अट

सायलीची ही कमेंट वाचून आकाशनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आकाशने सायलीच्या कमेंटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. त्यावर “येतोय वरात घेऊन”, अशी कमेंट त्याने केली आहे. त्याच्या या इन्स्टाग्राम स्टोरीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आकाश ठोसरची प्रतिक्रिया

दरम्यान आकाशने शेअर केलेला हा फोटो त्याच्या आगामी चित्रपटासंबंधित आहे. येत्या ७ एप्रिलला त्याचा घर, बंदूक, बिरयानी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यासंबंधितच त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat fame akash thosar share groom look photo sayali patil comment on marriage rumor nrp
Show comments