२०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटात रिंकू राजगुरुने आर्चीची भूमिका साकारली होती. तर परश्याची भूमिका आकाश ठोसरने केली होती. यात परश्याच्या मित्रांच्या भूमिकेत तानाजी गळगुंडे झळकला होता. या चित्रपटामध्ये ‘लंगड्या’ची भूमिका साकारणाऱ्या तानाजीने आता एका मुलाखतीत जाती व्यवस्थेवर मत मांडलं आहे.
‘सैराट’मध्ये जे दाखवलंय तसं कधी आजूबाजूला घडलं आहे का? गावात अजूनही असा भीषण घटना घडतात का? असं विचारल्यावर ‘आरपार’ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तानाजी म्हणाला, “या घटना घडण्याचं मुख्य कारण जातव्यवस्था आहे. आपल्याकडे जातव्यवस्था जास्त आहे. तसेच गरीब आणि श्रीमंत हेही एक कारण आहे. जातव्यवस्था हे सर्वात मोठं व भीषण कारण आहे. प्रत्येक आई-बाबाला वाटतं की आपल्या मुलीने किंवा मुलाने दुसऱ्या जातीत लग्न करू नये.”
पुढे तानाजी स्वतःचं उदाहरण देत म्हणाला, “माझी गर्लफ्रेंड वेगळ्या जातीतली आहे. दोघेही वेगवेगळ्या जातीचे आहोत. मी जातीवाद मानत नाही. मी या सगळ्याच्या खूप पलीकडे गेलो आहे. नात्याला पाच-सहा वर्षे झाली पण मी घरी काहीच सांगितलं नाही. आम्ही दोघेही पुण्यात होतो आणि मी घरी काहीच सांगितलं नव्हतं. कारण त्यांना ते पटणार नव्हतं. नंतर माझी गर्लफ्रेंड मला सतत म्हणू लागली की तू तुझ्या घरी सांग की आपण रिलेशनशिपमध्ये आहोत आणि सोबत राहणार आहोत. मी तिला म्हटलं अगं त्यांना पटणार नाही, मग कशाला सांगायचं. आपण छान राहू, पुढे मुलं-बाळं झाली की थेट त्यांनाच घेऊन जाऊ. कदाचित चुकीचं असेल माझं म्हणणं पण मी तिला हेच सांगायचो.”
पुढे तानाजी म्हणाला, “तिच्या आग्रहास्तव घरी सांगायचं ठरलं. मी तिला म्हटलं की मी बोलणार नाही तूच बोल. माझं ऑपरेशन झाल्याने काळजी घ्यायला आई पुण्यात आली होती. गर्लफ्रेंड माझ्या आईच्या ओळखीची होती. कारण तिची आई आमच्याच गावची होती. लहानपणापासून एकमेकांना ओळखतो. आईला सांगायचं ठरल्यावर मी तिला नाही म्हटलं पण तिने ऐकलं नाही. आमचं काय चाललंय हे आईला माहीत नव्हतं तोपर्यंत त्या दोघींचं छान जमायचं. दोघी एकेठिकाणी बसून चर्चा करत असताना पाहिलं. माझी आई तिला नाही, नाही म्हणत होती. गर्लफ्रेंड आत आल्यावर तिला विचारलं, झालं का बोलणं? ती म्हणाली, ‘हो, पण त्या नकार देत आहेत.’ मी तिला बोललो की मी हेच तुला सांगतोय, त्यांना ही गोष्ट पटणार नाही तर नको सांगायला, आपण राहू एकत्र. मग ती निघून गेली.”
सिनेमा फ्लॉप झाल्याने बुडाले पैसे, बॉलीवूड अभिनेता कोट्यवधींचं कर्ज फेडण्यासाठी सर्कसमध्ये….
गर्लफ्रेंड गेल्यावर आई रागावल्याचं तानाजीने सांगितलं. “आईने मग माझ्यावर राग काढायला सुरुवात केली. तुला यासाठीच पुण्याला पाठवलं का वगैरे बरंच बोलली. मी तिला म्हटलं मी त्या मुलीबरोबर राहणार आहे, तुम्हाला काही अडचण आहे का? खरं तर तुम्हाला विचारायचं होतं पण तुमच्या विचारांमुळे हिंमत नाही झाली, कारण तुम्ही नकार देणार हे मला माहीत होतं. मग आमचं कडाक्याचं भांडण झालं. ‘दुसरी कोणतीही मुलगी आण पण तिच्यासोबत नाही राहायचं,’ असं ती म्हणत होती. का तर तिला गाव ओळखतं आणि गावाला माहीत आहे की ती कुणाची मुलगी आहे आणि ती कोणत्या जातीची आहे. दुसऱ्या जातीची तू आण आमची हरकत नाही, आमचा जातीला विरोध नाही, पण ती नको आणि अशी आण की जी गावाला माहीत नाही. मला या विचारसरणीचा दबाव आला, ते सगळं कसं सांभाळू हे मला कळत नव्हतं, ” असं तानाजी म्हणाला.
“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग
मुलीच्या घरून एवढा विरोध नव्हता. ती पुण्यात राहायची आणि तिचं कुटुंब पुढारलेलं आहे, असंही तानाजीने सांगितलं. स्वतःत हे सगळे बदल ‘सैराट’नंतर पुण्यात आल्यावर झाले, असंही त्याने नमूद केलं.
© IE Online Media Services (P) Ltd