नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटात आर्चीच्या भावाची म्हणजेच प्रिन्सची भूमिका करणारा अभिनेता सुरज पवार काही दिवसांपूर्वी फारच चर्चेत आला होता. त्याच्यावर एकाने फसवणुकीचा आरोप केला होता. मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन शिर्डीतील एका व्यक्तिला फसवल्याचा आरोप त्याच्यावर केला गेला होता. दरम्यान या प्रकरणावर सुरजने अखेर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : विजय सेतुपतीच्या ‘गांधी टॉक्स’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार महत्वपूर्ण भूमिका

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

सुरजने फेसबुकवर पोस्ट शेअर करत त्याची मानहानी केल्याचं म्हटलं आहे. हे नुकसान कधीही न भरून निघणारं आहे असं सूरज या पोस्टमध्ये म्हणाला. तसंच यातून निर्दोष सुटल्यानंतर कुणी त्याबद्दल बोललं नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे.

सुरजने त्याच्या फेसबुक अकाउंटवर एक मोठी पोस्ट शेअर केली. त्यात त्याने लिहिलं, “नमस्कार मी सूरज पवार, गेले दहा पंधरा दिवसात माझी एवढी मानहानी झाली किंवा केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सगळ्याच‌ मीडियाने माझे एवढे धिंडवडे काढले. तरी पण मी शांत होतो. अखेर मी स्वत: राहुरी पोलीस स्टेशनला हजर झालो. पोलिसांसमोर सर्व कागदपत्रांसह माझे म्हणणे नमुद केले. त्यानंतर वेळोवेळी राहुरी पोलीस सांगतील त्या दिवशी हजर राहात होतो. पोलीस स्टेशनला पहिल्यांदा हजर राहिलो आणि बाहेर मिडीयात ‘प्रिन्सला पोलीसांनी केली अटक! प्रिन्स खाणार जेलची हवा! प्रिन्स अखेर जेरबंद!’ या अशा मधळ्याच्या बातम्या देऊन प्रिंट आणि डिजिटल मिडीयाने कुठलीही शहानिशा न करता माझ्या नावाने महाराष्ट्रभर रान पेटवलं.”

पुढे त्याने लिहिलं, “खरे पाहाता राहुरी पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत आणि त्यानंतर दाखल झालेल्या असंख्य तक्रारीत तक्रारदारांनी मला फक्त चित्रपटात काम करताना पाहिलं होतं. परंतू प्रत्येक्षात ते मला कधीच भेटले नव्हते. राहुरी पोलीस‌ स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अखेर सर्व तक्रारदारांना पोलीस स्टेशनला बोलवून त्याची खात्री करून घेतली. तर एकाही तक्रारदारची माझ्याबाबत तक्रार नव्हती. आरोपींनी बचावाचा हेतू ठेवून माझे नाव घेतले होते. हे पोलिसांसमोर सिद्ध झालं. पोलीस अधिकारी श्री. दराडेसाहेब आणि श्री. सज्जनकुमार नऱ्र्हेडा आणि पोलीस टीमने सर्व सत्यता पडताळली आणि अखेर माझ्यावर लागलेलं ‘किटाळ’ एकदाचं संपलं.”

“यामध्ये झालेली मानहानी हे नुकसान कधी भरून येणारं आहे. माझ्या जवळच्या लोकांचा माझ्यावरील विश्वास या प्रकरणातून उडाला. असंख्य जवळची माणसे आणि नाती माझ्यापासून दुर गेली,” असंही त्याने म्हटलं.

हेही वाचा : ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा येणार दूसरा भाग, नागराज मंजुळेची मोठी घोषणा

काय आहे प्रकरण ?

नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांना मंत्रालयात नोकरी देण्याचं आमिष दोन जणांनी दिलं होतं. यासाठी त्यांच्याकडून ५ लाखांची मागणीही करण्यात आली होती. नोकरी लागल्यावर तीन लाख तर सुरुवातीला २ लाख अशी त्यांची बोलणी झाली होती. महेश हे पैशांचं पाकीट देण्यासाठी राहुरी इथे गेले असता त्यांना आपली फसवणूक होत असल्याची समजले. त्यानंतर त्यांनी रितसर अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात केली. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दत्तात्रय क्षिरसागर (रा. नाशिक), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे (दोघेही राहणार संगमनेर) अशा तीन जणाांना अटक करण्यात आली.

या सर्व प्रकरणात सैराट फेम अभिनेता सूरज पवार याचाही सहभाग असल्याचे म्हटलं गेलं. या प्रकरणी महेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.