आजकाल कलाकार मंडळी जितके त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात तितकेच ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. फोटो, व्हिडीओ आणि आपल्या कामाच्या संदर्भातील नवनवीन अपडेट सोशल मीडियाद्वारे कलाकार चाहत्यांना देत असतात. अनेकदा ट्रोलही होतात. पण बरेच कलाकार याकडे दुर्लक्ष करतात तर काही कलाकार ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात. सध्या अभिनेत्री सखी गोखले व अभिनेता आशय कुलकर्णीच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अलीकडेच सखी गोखलेने आशय कुलकर्णीसह केलेला डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. “पावसाळा, त्यात शहरातील रिकामे रस्ते, त्यामध्ये वेड्या मित्राची सोबत आणि मग थोडसं झुबी डूबी”, असं कॅप्शन लिहित सखीने हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असून नेटकरी दोघांचं कौतुक करत आहेत.

popular director Sameer Vidwans and Juilee Sonalkar kelvan
मराठी, हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे समीर विद्वांस लवकरच चढणार बोहल्यावर; ‘या’ मराठी कलाकारांनी केलं केळवण
ashok saraf door name plate grabs attention
“धनंजय माने इथेच…”, अशोक सराफ यांच्या दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? ‘अशी ही बनवाबनवी’शी आहे खास कनेक्शन
marathi actor nana patekar talks about his elder son death
अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांच्या मोठ्या लेकाचं झालं निधन, अभिनेते म्हणाले, “मी त्याच्या इतका तिरस्कार…”
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल
Ardhavatrao and aavadabai dance on Dance On Sooseki Song Of Pushpa 2 Movie
Video: ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावरील अर्धवटराव व आवडाबाईचा डान्स पाहिलात का? व्हिडीओ होतोय व्हायरल
nana patekar talks about wife neelkanti patekar
“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…
bollywood actress meenakshi seshadri dance with Choreographer ashish patil video viral
Video: ८०-९०च्या दशकात बॉलीवूड गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखंत का? प्रसिद्ध मराठी नृत्यदिग्दर्शकासह केलेल्या सुंदर नृत्याने वेधलं लक्ष
Marathi actress danced on pushpa-2 sooseki song in tank top and shorts video viral
टँक टॉप आणि शॉर्ट्सवर ‘या’ अभिनेत्रीने केला ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर डान्स; नेटकरी म्हणाले, “साडी नेसायची…”

हेही वाचा – ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या परीक्षणासाठी संकर्षण कऱ्हाडेने दिला होता नकार पण…; अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

या व्हिडीओत, २००९ साली प्रदर्शित झालेला आमिर खान व करीना कपूरचा ‘थ्री इडियट’ चित्रपटातील ‘झुबी डूबी’ गाण्यावर सखी व आशयने डान्स केला आहे. भर रस्त्यात दोघं डान्स करताना दिसत आहेत. यावेळी दोघांनी सारख्या रंगाचे कपडे घातले आहेत.

सखी व आशयचा हा डान्स व्हिडीओ पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी कौतुक केलं आहे. “मला वाटलं हा सुव्रत आहे. पण डान्स छान होता”, “आशय आणि सुव्रत दोघेपण सारखेच दिसतात मला,” “सुव्रत जळाला असेल”, “छान”, “मस्त”, “सुपर क्यूट”, “व्वा”, “भारी”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सखी व आशयच्या डान्स व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – १७ वर्षांचा जुना नियम यंदा ‘बिग बॉस ओटीटी ३’ने तोडला; स्पर्धकांना दिले पर्सनल फोन अन्…; जाणून घ्या नवा ट्विस्ट

दरम्यान, सखी व आशयच्या या ‘झुबी डुबी’ डान्स व्हिडीओला १४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाखांहून अधिक जणांनी लाइक केलं असून अजूनही नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.