अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी यांची जोडी मराठी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे दोघेही प्रसिद्धीझोतात आले. मालिकेत एकत्र काम करताना त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली होती आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २०१९ मध्ये सखी आणि सुव्रतने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

हेही वाचा : “…म्हणून मी नाटकांमध्ये काम करत नाही”; प्रार्थना बेहरेने सांगितलं कारण, म्हणाली “सततची बेचैनी अन्…”

सखी ही सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आहे. लग्नापूर्वी सुव्रत जोशी सखी आणि तिच्या आईसह एकत्र राहायचा. सुव्रत आणि सखीच्या नात्याबद्दल शुभांगी गोखलेंना समल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? याबद्दल दोघांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. सखी म्हणाली, “सुव्रतला मी पहिल्यांदा भेटले तेव्हा मी फक्त २१ वर्षांची होते. सुव्रतचं आमच्या घरी येणं-जाणं असायचं त्यामुळे आईला अगदी पटकन या सगळ्या गोष्टींचा अंदाज आला होता.”

हेही वाचा : “स्वामींबद्दल काय सांगशील?”, चाहत्याच्या प्रश्नावर गश्मीर महाजनी म्हणाला, “त्यांच्या आशीर्वादाने…”

“”दिल दोस्ती…” मालिका करताना सुव्रत आजारी पडला होता. त्यानंतर हळुहळू तो आमच्या घरी राहायला आला. तेव्हा आई आम्हाला दोघांनाही जेवणाचे डबे बनवून द्यायची. आईने माझ्या एका मित्राला घरी राहण्याची परवानगी देणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर काही काळाने आईने आम्हाला दोघांना एकत्र बसवलं आणि तुमचं नेमकं काय आहे? असा प्रश्न विचारला होता. त्यादिवशी मी आईला सगळं नीट सांगितलं… मी, सुव्रत आणि आई आम्ही तिघांनीही एकत्र बसून या विषयावर चर्चा केली. तिनेही आम्हाला समजून घेत नात्याला परवानगी दिली.” असं सखीने सांगितलं.

हेही वाचा : Video: लग्नानंतर पहिल्यांदाच राघव चड्ढा व परिणीती चोप्रा आले माध्यमांसमोर, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेनंतर सखी आणि सुव्रतने एकत्र ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकात काम केलं होतं. २०१९ मध्ये मुंबईत त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

Story img Loader