"विक्रम गोखले व माझे वडील भाऊ नव्हते आणि..." चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सखी गोखले संतापली | sakhi gokhale share post related to vikram gokhale death and talk about family relation with actor see details | Loksatta

“विक्रम गोखले व माझे वडील भाऊ नव्हते आणि…” चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सखी गोखले संतापली

विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सखी गोखलेने एक पोस्ट शेअर केली आहे.

“विक्रम गोखले व माझे वडील भाऊ नव्हते आणि…” चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सखी गोखले संतापली
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सखी गोखलेने एक पोस्ट शेअर केली आहे.

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही अभिनयाचा ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. गेले काही दिवस त्यांची प्रकृती नाजुक होती. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान अभिनेत्री सखी गोखले यांनी विक्रम गोखले यांच्याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. विकिपीडियावर विक्रम गोखले हे सखीचे काका आहेत असं दाखवलं जात आहे. तसेच विक्रम गोखले यांच्याबाबत एकही पोस्ट शेअर न केल्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आलं. याबाबत आता तिने एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – “कधी बायको म्हणून…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर नीना कुळकर्णी भावूक, एकत्र केलेला ‘तो’ चित्रपट ठरला शेवटचा

सखी म्हणाली, “अभिनेते विक्रम गोखले हे एक उत्कृष्ट अभिनेता होते. लहानपणापासून त्यांचं काम व त्यांची पडद्यावरची जादू मी पाहिली आहे. त्यांचं जाणं ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. पण विक्रम काका व माझे वडील हे दोघं भाऊ नव्हते. विक्रम काकांच्या कुटुंबांचा व आमचा काहीही संबंध नाही. फक्त दोन कुटुंबामध्ये मैत्रीचं नातं आहे. इंटरनेटवरील प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विकिपीडियाचा वापर करत तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडत असाल तर ती तुमची चुकी आहे.”

“त्यांचा (विक्रम गोखले) माझ्याशी काही संबंध आहे की नाही, मी त्यांच्याबाबत काही पोस्ट करायचं की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. विक्रम काका गेल्यानंतर त्यांच्याबाबत मी काहीच पोस्ट शेअर केली नाही. याबाबतचे असंख्य मॅसेज मला आले आहेत. शिवाय काहींनी माझ्यावर राग व्यक्त केला आहे. माझ राग करण्याआधी यामागे खरं कारण काय आहे हे शोधा. माझ्याशी विनम्र वागण्यात तुम्ही जेवढा वेळ घालवलात त्या वेळेचा तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी वापर करा. जेणेकरून तुमच्या कुटुंबियांना व मित्रांना तुमची लाज वाटणार नाही.” सईने सत्य सांगत ट्रोल करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 12:52 IST
Next Story
Video : भर पार्टीत बायकोला नाचताना पाहून भारावला अमृता खानविलकरचा नवरा, अभिनेत्रीची आईही बघतच बसली अन्…