शुभांगी गोखले यांचा जुना फोटो शेअर करत सखी गोखलेची आईसाठी खास पोस्ट | sakhi gokhale worte a special post for shubhangi gokhale on her birthday | Loksatta

शुभांगी गोखले यांचा जुना फोटो शेअर करत सखी गोखलेची आईसाठी खास पोस्ट

सखीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

शुभांगी गोखले यांचा जुना फोटो शेअर करत सखी गोखलेची आईसाठी खास पोस्ट

अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी मराठीसोबतच हिंदी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. त्या मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांची मुलगी अभिनेत्री सखी गोखले दरवर्षी आईच्या वाढदिवस काही ना काही करून स्पेशल करत असते. आता आज तिने आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

सखी गोखले ही तिच्या मनमोकळ्या स्वभावाने तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय राहत ती विविध तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते. तिच्या आईशी म्हणजे अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्याबरोबर तिचं खास नातं आहे. ती बऱ्याचदा तिच्या आईबद्दल तिला वाटणारं प्रेम हटके शब्दात व्यक्त करत असते. आज आईच्या वाढदिवसानिमित्त तिने त्यांचा एक कोणीही न पाहिलेला सुंदर फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा : Video: बॉलिवूड पदार्पणाचा आनंद गगनात मावेना, बार काउंटरवर चढून बेभान होऊन नाचली ‘ही’ मराठी अभिनेत्री

हेही वाचा : Mother’s Day 2022 : ‘या’ मराठी सुप्रसिद्ध कलाकारांच्या आई आहेत उत्तम अभिनेत्री, पाहा फोटो

सखीने आज सकाळी शुभांगी गोखले यांचं एक जुना फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. या फोटोत शुभांगी गोखले निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून पारंपरिक दागिने परिधान केलेल्या दिसत आहेत. तसंच आंबाड्यात त्यांनी लाल रंगाचं फूल माळलं आहे. हा फोटो शेअर करत सखीने लिहीलं, “हॅप्पी शुभांगी डे टू एव्हरीवन…!” सखी गोखलेने आईचा पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 12:42 IST
Next Story
रिक्षा चालकाच्या बाजूला बसून मराठमोळ्या अभिनेत्रीचा प्रवास; पोस्ट शेअर करत म्हणाली “आपली चौकट…”