Shubhangi Sadavarte Video: तीन महिन्यांपूर्वी दुसरं लग्न करणाऱ्या मराठी अभिनेत्रीने एक गुड न्यूज शेअर केली आहे. ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्तेने पतीला नवीन गाडी भेट दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती, तिचा पती व इतर काही सदस्य नव्या गाडीची डिलिव्हरी घेताना दिसत आहेत.

शुभांगीने फ्लॉवर प्रिंट असलेला छान को-ऑर्ड सेट घातला आहे. त्याचबरोबर मोत्याच्या दागिन्यांनी तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. शुभांगी व्हिडीओत खूपच छान दिसतेय. शुभांगीने नेक्साची एक काळ्या रंगाची कार घेतली आहे. व्हिडीओमध्ये ती व तिचा पती सगळ्या फॉरमॅलिटिज पूर्ण करून कारची डिलिव्हरी घेताना दिसत आहे. नव्या गाडीचा आनंद शुभांगी व सुमित यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय.

“मोठी स्वप्ने पाहा, सकारात्मक राहा, खूप परिश्रम करा आणि प्रवास एंजॉय करा. माझ्या प्रेमाला, सुमित म्हशेळकरला वाढदिवसाचं गिफ्ट,” असं कॅप्शन शुभांगी सदावर्तेने व्हिडीओला दिलं आहे.

पाहा शुभांगी सदावर्तेचा व्हिडीओ

शुभांगीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर यशोमन आपटे, अक्षय केळकर, सौरभ चौघुले यांनीही कमेंट्स केल्या असून शुभांगी व सुमितचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, शुभांगी सदावर्तेबद्दल बोलायचं झाल्यास तिने डिसेंबर महिन्यात सुमित म्हशेळकरशी दुसरं लग्न केलं. घटस्फोटाच्या घोषणेनंतर अवघ्या ३ महिन्यात ती लग्नबंधनात अडकली. तिने सुमितशी अगदी साधेपणाने मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. लग्नाआधी त्या दोघांच्या मित्रांनी त्यांचं हॉटेलमध्ये केळवण केलं होतं.

शुभांगी सदावर्तेचं पहिलं लग्न व घटस्फोट

अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिचं पहिलं लग्न संगीतकार आनंद ओक यांच्याशी झालं होतं. शुभांगी व आनंद यांनी २०२० मध्ये करोना काळात लग्नगाठ बांधली होती. पण पाच वर्षांच्या संसारानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये आनंद ओक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून घटस्फोटाची घोषणा केली होती. “शुभांगीला तिच्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. ती उत्तम अभिनेत्री आणि खूप चांगली व्यक्ती आहे. भविष्यात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही एकत्र काम करत राहू…,” असं आनंद ओक म्हणाले होते.