Sanjay Jadhav daughter Dhriti Jadhav food stall: संजय जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी विविध सिनेमांतून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. दुनियादारी हा त्यांचा सिनेमा प्रचंड गाजला होता. ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीस येतात. मुलगी ध्रितीबरोबर ते विविध व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांनी आजवर अनेक रेसिपी व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत.

“आपण करून दाखवलं”

संजय जाधव यांची लेक ध्रितीने जेवण बनवण्याची आवड जपल्याचे तिच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. आता नुकताच तिने एका फेस्टिव्हलमध्ये तिचा स्टॉल लावला होता, त्याची पोस्ट तिने शेअर केली आहे. तिने काही फोटो पोस्ट करत लिहिले, “बघा पप्पा, आपण करून दाखवलं.”

पुढे तिने लिहिले, “आता अन्न PLATED तुमचं आहे. मी फक्त एकच विचार करत राहिले की एक दिवस असा येईल, जेव्हा मी स्वतः बनवलेले, प्रत्येक पदार्थात माझा जीव ओतून तयार केलेले जेवण लोकांना माझ्या पद्धतीने वाढू शकेन. प्रत्येकाला त्या पदार्थाच्या चवीचा मनापासून आस्वाद घेता यावा, त्यातील प्रत्येक फ्लेवर अनुभवता यावा आणि अर्थातच, माझ्या मराठी मुळांशी जोडलेलं राहून, आपल्या पारंपरिक पदार्थांना थोड्याशा आधुनिक पद्धतीने वाढता येईल.”

पुढे तिने ज्या फेस्टिव्हलमध्ये हा स्टॉल लावला होता, त्यांना टॅग करत त्यांचे आभार मानले. तिने त्योहार फेस्टिव्हलला टॅग करत लिहिले, “माझा पहिला पॉप-अप स्टॉल सुरू करण्याची संधी दिल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मनापासून आभार, ही सुरुवात तुमच्याशिवाय इतर कुठेही झाली नसती.”

तसेच, तिने तिला या प्रवासात साथ देणाऱ्या जवळच्या लोकांचे आभार मानले. तसेच, त्यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शेवटी तिने लिहिले, “आज सकाळी उठताना मनात खूप कृतज्ञता होती. ‘अन्न plated’साठी पुढे काय काय घडणार आहे, यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि जगाला माझ्यातलं आणखी बरंच काही दाखवण्यासाठीही तयार आहे. अशाच अनेक सुंदर क्षणांचा आणि ‘अन्न plated’चा आणखी मोठा प्रवास पुढे असणार आहे.”

ध्रितीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. श्रेया बुगडेने लिहिले, “अभिनंदन”, सोनाली कुलकर्णीने, “कूल शेफ”, सोनाली खरेने, “अभिनंदन”, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. याबरोबरच, विशाखा सुभेदारनेही कमेंट करत मला तुझा डान्स, जेवण बनवण्याचे पॅशन आवडते. याबरोबरच अनेक चाहत्यांनीही कमेंट्स करत ध्रितीचे कौतुक केले आहे.

दरम्यान, आता ध्रितीचे अन्न Plated मोठ्या स्वरुपात पाहायला मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.