मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेह पोंक्षे लवकरच सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. शरद पोंक्षे यांनीच याबाबत सोशल मीडियावर घोषणा केली आहे. ते स्नेह दिग्दर्शित करत असलेल्या त्याच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. याबाबत त्यांनी फेसबूक पोस्ट केल्यावर अभिनेते संजय मोने यांनी केलेल्या कमेंटने लक्ष वेधलं आहे.

स्नेहच्या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही, लवकरच त्याबाबत घोषणा करू, स्नेह पोंक्षे लिखीत दिग्दर्शित हा सिनेमा दिवाळी २४ पर्यंत प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे, असं शरद पोंक्षे यांनी लिहिलं होतं. त्यावर कमेंट करत अभिनेते संजय मोने म्हणाले, “मी त्यात काम करतो आहे, विनाअट कारण शरदने नथुराम गोडसेचे काम करताना आणि असंख्य अडचणीचा सामना करतांना कुठल्याही तथाकथित रंगकर्मींकडे “मी व्यक्त होतोय, मला उचलून धरा”असं कधीही सांगितलं नाही.
थोडक्यात नथुराम गोडसे सादर करताना तो महात्मा गांधींचं वचन अवलंबत होता
“एकला चालो रे!” याहून गंमत काय असणार आहे?
व्यक्तिशः मी त्या सगळ्या गोष्टींच्या तत्वांशी सहमत नाही पण ना मी गांधी पाहिले ना मी नथुराम गोडसे पाहिले…त्यामुळे न पाहिलेल्या लोकांच्या बाबतीत काही बोलणे हे गैरलागू आहे.
शेवटी शरद पोंक्षे हा माझा मित्र आहे आणि त्याच्या मुलाच्या चित्रपटात काम करणं हे माझ्यासाठी एक मैत्रीबंधन आहे.”
संजय मोनेंच्या कमेंटवर शरद पोंक्षे यांनी उत्तर दिलं. “व्वा संजय लव्ह यू यार. किती छान व्यक्त होतोस आणि हे ऋण कधीही न विसरता येणारं,” असं ते म्हणाले.

Ramdas Athawale yoga
रामदास आठवलेंचे योगासन पाहून नेटिझन्सना हसू आवरेना; म्हणाले, ‘तुम्ही फक्त राहुल गांधींना ट्रोल करा’
What Laxaman Hake Mother Said?
लक्ष्मण हाकेंच्या आईला अश्रू अनावर; “लेकराच्या पोटात अन्न नाही, आम्ही आता..”
ajit pawar chhagan bhujbal unhappy
राज्यसभेच्या उमेदवारी वरून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा; अजित पवार म्हणाले, “आमच्या जवळच्या काही मित्रांनी…”
Clarify stand on Jitendra Awhads plea to consolidate all offences High Court orders govt
श्रीरामाबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य : सर्व गुन्हे एकत्र करणाच्या आव्हाडांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
Kangana Ranuat
कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबलच्या भावाची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी बहीण…”
sanjay raut on cisf constable kulwinder kaur
कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावल्याचं प्रकरण; संजय राऊत म्हणाले, “मला त्यांच्याबद्दल सहानुभूती, मात्र…”
Kisan Kathore, Bhiwandi,
भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या विजयापेक्षा किसन कथोरेंचीच चर्चा अधिक
Chhagan bhubal and hasan mushrif
जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्याने छगन भुजबळांना घरचा आहेर; हसन मुश्रीफ म्हणाले, “मनुस्मृतीचा विषय बाजूला पडेल…”
sanjay mone comment on sharad ponkshe post
संजय मोने यांची कमेंट व शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया

मुलाच्या पहिल्या चित्रपटाबद्दल निर्माते शरद पोंक्षे यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. “एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मुलाच्या सोबतीने ही वेगळी भूमिका साकारत आहे. यापूर्वी स्नेहने पाच वर्षं सह-दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मला खात्री आहे, तो ही जबाबदारी उत्तमरित्या पेलेल,” असं ते स्नेहबद्दल म्हणाले होते.