scorecardresearch

“अन्ना रासकला…”  मराठमोळ्या संतोष जुवेकरला मिळाली दाक्षिणात्य जाहिरात, व्हिडीओ पाहिलात का?

संतोष जुवेकरने शेअर केला दाक्षिणात्य जाहिरातीचा व्हिडीओ चर्चेत

“अन्ना रासकला…”  मराठमोळ्या संतोष जुवेकरला मिळाली दाक्षिणात्य जाहिरात, व्हिडीओ पाहिलात का?
संतोष जुवेकरचा व्हिडीओ चर्चेत. (फोटो: संतोष जुवेकर/ इन्स्टाग्राम)

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘मोरया’, ‘झेंडा’, ‘पोलीस लाइन’, ‘एक तारा’ या चित्रपटातून त्याने अभिनयाची छाप पाडली. गेल्याच महिन्यात त्याचा ‘३६ गुण’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याने दिलेल्या इंटिमेट सीनची बरीच चर्चा रंगली होती.

आता संतोषचा एक वेगळाच लूक चाहत्यांना पाहायला मिळत आहे. संतोष जुवेकर एका दाक्षिणात्य जाहिरातीत झळकला आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने “ये अन्ना रासकला!! विजू तू मेरेको दक्षिण की दिशा दिखाया उसकी दक्षिणा मै तेरेको जरुर देगा” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा>> लग्नानंतर रात्रीच राणादा पाठकबाईंना कॉफी डेटला घेऊन गेला अन्…; फोटो व्हायरल

हेही वाचा>> Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल

संतोष जुवेकरची ही जाहीरात एका ओट्स कंपनीची आहे. या जाहिरातीत त्याचा दाक्षिणात्य अंदाज पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य स्टाइलने तो या व्हिडीओमध्ये अक्शन सीन्सही करताना दिसत आहे. याबरोबरच डायलॉगही साउथ इंडियन स्टाइलमध्ये बोलताना दिसत आहे.

हेही वाचा>> “नवरा-बायकोमधील संवाद…” प्रिया बापटने शेअर केलेल्या व्हिडीओने वेधलं लक्ष

संतोष जुवेकरने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या चाहत्यांच्याही हा व्हिडीओ पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 18:22 IST

संबंधित बातम्या