मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा तो मजेशीर पोस्ट शेअर करत असतो. तसेच फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असतो. संतोषने आज एक फोटो शेअर केला आहे. त्यात हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजसारखे दिसणारे तिघे जण आहेत. हा फोटो शेअर करत आपण आधार कार्डवर टॉमसारखेच दिसत असल्याचं संतोषने म्हटलंय.
हेही वाचा – अभिनेत्री स्नेहल रायच्या कारला अपघात, पुण्याच्या दिशेने जाताना ट्रकने दिली धडक




हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यात तीन जण आहेत आणि ते तिघेही सारखेच दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर वेगवेगळ्या कॅप्शनने फिरतोय. काहींच्या मते हा आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सने तयार केला आहे, तर काहींच्या मते या फोटोतील एक खरा टॉम असून इतर दोघे त्याचे बॉडी डबल आहेत. हाच फोटो संतोष जुवेकरने शेअर केला आहे आणि त्याला मजेशीर कॅप्शन दिलंय.
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने पोहोचला कोकणातील गावी, त्याचं टुमदार कौलारू घर पाहिलंत का?
संतोष जुवेकरने फोटो शेअर करत लिहिलं, “जर हा फोटो खरा असेल तर असा सेम कुणी माझ्यासारखाच दिसणारा असेल तर मला फोटो पाठवा. एकाच वेळेला खूप कामं आली तर वाटून घेता येतील. खरंच पाठवा आणि मला टॅग करा. एकमेका सहाय्य करू अवघे मिळवू यश. ए टॉम्या तुलापण टॅग केलंय. तू पण पाठवू शकतोस बरं का तुझा फोटो. तुझ्या आधार कार्डवरील फोटो सारखाच दिसतो मी. काळजी करू नको, आपण सारखेच आहोत.”
दरम्यान, संतोष जुवेकरच्या या मजेशीर पोस्टवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. काहींनी ‘तुझ्यासारखा दिसणारा एक जण आहे’, ‘एक पाहिला होता रियाधमध्ये सापडला की पाठवतो तिकडे’, ‘कोल्हापुरात मामाचा एक मित्र तुझ्यासारखाच दिसतो’, अशा कमेंट्स यावर केल्या आहेत.