“कोणालाही कळू न देता मी गुपचुप…” अखेर सायली संजीवने उघड केलं गुपित | Sayali sanjeev learned basics of stitching for her upcoming film paithani | Loksatta

“कोणालाही कळू न देता मी…” अखेर सायली संजीवने उघड केलं गुपित

अभिनेत्री सायली संजीव ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच तिच्या कामामुळे प्रचंड चर्चेत आहे.

“कोणालाही कळू न देता मी…” अखेर सायली संजीवने उघड केलं गुपित

अभिनेत्री सायली संजीव ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसंच तिच्या कामामुळे प्रचंड चर्चेत आहे. लवकरच ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसते. या दरम्यान तिने या चित्रपटाशी निगडित तिचं एक गुपित उघड केलं आहे.

सायली संजीव ही चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आतापर्यंत साकारलेली प्रत्येक भूमिका ही वैविध्यपूर्ण असून प्रत्येक कामात ते तिचं काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करते. ‘पैठणी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानेही तिने अशीच एक गोष्ट केली आहे. या चित्रपटातील पात्र साकारण्यासाठी तिने कोणालाही न सांगता शिवणाचा क्लास लावला होता. आता एका मुलाखतीत तिने हे गुपित उघड केलं आहे.

आणखी वाचा : गश्मीर महाजनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज, ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झळकणार प्रमुख भूमिकेत

सायलीने सांगितलं, “या चित्रपटात मी शिवणकाम करणारी, आजूबाजूच्या बायकांच्या साड्यांना फॉल बिडिंग करून देणारी, ब्लाऊज शिवून देणारी एका साध्या गृहिणीची भूमिका साकारत आहे. मला अभिनयाच्या जोरावर ही भूमिका नक्कीच साकारता आली असती. पण त्यात नैसर्गिकता आणण्यासाठी आणि त्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी मी दोन दिवसांचा शिवणकामाचा क्लास लावला. मी शिवणकामाचा क्लास लावला आहे ही गोष्ट मी कोणालाही सांगितली नाही.”

पुढे ती म्हणाली, “‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटात मी अतिशय जुन्या काळातील मशीनवर काम करतेय. त्यामुळे मला शिलाई मशीन हाताळणे, सुईमध्ये दोरा भरणे, मशीनमध्ये तेल टाकणे या सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजचं होतं. कुठेही माझा अभिनय कृत्रिम वाटू असे असं मला मनापासून वाटत होतं. म्हणूनच कोणालाही कळू न देता मी हा शिवण कामाचे प्रार्थमिक धडे घेतले होते.”

हेही वाचा : “मी ज्यांना प्रपोज केलं त्यांनी…”; सायली संजीवचा प्रेमाबद्दल मोठा खुलासा

‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट २ डिसेंबर २०२२ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 14:18 IST
Next Story
“मी टीकेचा धनी…” सिद्धार्थ जाधवने केले सिनेसृष्टीतील ट्रोलिंगवर भाष्य