Premium

शूटिंगच्या पहिल्याच दिवशी सायली पाटीलने ठोकली आकाश ठोसरची कार, अन्…

जेव्हा आकाश ठोसरला कळलं शूटिंगच्या पहिल्याच दिवशी सायलीने ठोकली कार, अशी होती त्याची प्रतिक्रिया

sayali patil akash thosar (1)
(आकाश ठोसर-सायली पाटील)

नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयाणी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर व सायली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे आणि ते चित्रपटाच्या शूटिंगवेळचे काही किस्से सांगत आहेत. असाच शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा एक किस्सा समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video: भर उन्हात शेतात राबतेय मराठमोळी अभिनेत्री; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “कोणताच राजकारणी…”

सायली व आकाश यांनी यापूर्वी ‘झुंड’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा ‘घर बंदूक बिरयाणी’मध्ये ते दोघेही एकत्र भूमिका करत आहेत. आकाशबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना सायली म्हणाली, “आमची पहिली भेटपण फारच भन्नाट होती. मला ‘झुंड’च्या शूटिंगवेळी मला चारकाची गाडी शिकायची होती. आकाश पहिल्यांदाच गाडी घेऊन आला होता. मला माहीतच नव्हतं की ही त्याची गाडी आहे. ब्रेकमध्ये नागराज सरांनी मला गाडी शिकवायला आकाशची गाडी दिली होती. शिकत असताना मी गाडी थोडीशी पुढे नेली आणि समोरच्या खांबावर ठोकली आणि नंतर सगळ्यांनी तिथे गर्दी केली. लोक म्हणाले, ‘लेडी ड्रायव्हर आहे’. तेवढ्यात कोणीतरी बोललं की ती गाडी आकाशची आहे, हे कळाल्यावर मी गाडीतून उतरायलाच तयार नव्हते,” असं सायलीने सांगितलं.

“तो मला बाथरूममध्ये घेऊन गेला अन्…”; शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

गाडी ठोकल्यानंतर लोक जमा झाली, गर्दी बघून आकाश तिथे पोहोचला. त्याबद्दल सांगताना सायली म्हणाली, “थोड्या वेळाने आकाश तिथे आला व त्याने गाडीकडे पाहिलं, गाडीचा समोरचा भाग चेपला होता. मला वाटलं आकाश आता मला बोलणार. पण तो एकदम शांत होता. मला म्हणाला ‘ठीक आहे. एवढं काय त्यात, आता परत होणार आहे का?’” त्यानंतर त्याने मला जेवायला बोलावलं. मी खूप घाबरले होते, पण तो मात्र शांत होता, मला एक क्षण वाटलं, ‘हा वेडा आहे का असं कुणी कसं असू शकतं.’

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sayli patil crashed akash thosar car on first day of shooting hrc

Next Story
सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला आजारपणामुळे बोलणं, चालणंही झालं होतं कठीण, आता कशी आहे अवस्था? म्हणाली, “माझी प्रकृती…”