शाहरुख खानच्या 'पठाण'मुळे रितेश देशमुखच्या 'वेड'सह इतर मराठी चित्रपटांना फटका बसणार? थिएटर मिळत नसल्याच्या चर्चा | shahrukh khan deepika padukone pathaan movie affect on marathi films ved vaalvi bamboo see details | Loksatta

शाहरुख खानच्या ‘पठाण’मुळे रितेश देशमुखच्या ‘वेड’सह इतर मराठी चित्रपटांना फटका बसणार? थिएटर मिळत नसल्याच्या चर्चा

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा मराठी चित्रपटांवर परिणाम होणार का? मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नसल्याची चर्चा

marathi movie shahrukh khan
शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचा मराठी चित्रपटांवर परिणाम होणार का? मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नसल्याची चर्चा

एखादा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला की मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रिन्स न मिळणं हा मुद्दा बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतो. मराठी चित्रपटांना प्राईम टाइम शो व स्क्रिन्स मिळत नाहीत याबाबत अनेक कलाकारांनी याआधी भाष्य केलं आहे. पण पुन्हा तेच चित्र पाहायला मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चे मागचं कारण म्हणजे शाहरुख खानचा पठाण चित्रपट.

आणखी वाचा – शाहरुख खानचा ‘पठाण’ प्रदर्शित होताच बॉलिवूडवर भडकली कंगना रणौत, म्हणाली, “चित्रपटसृष्टीचा दर्जा…”

‘पठाण’ चित्रपटाचा मराठी चित्रपटांवर परिणाम होणार का?

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांनी या चित्रपटांची तिकिटं बुक केली. पण या चित्रपटाच्या बरोबरीनेच काही मराठी चित्रपटही प्रदर्शित होत आहेत. रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने गेल्या चार आठवड्यांमध्ये ५५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.

तर दुसरीकडे सुबोध भावे, स्वप्निल जोशी सारख्या सुप्रसिद्ध कलाकारांचा ‘वाळवी’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहे. शिवाय ‘बांबू’, ‘पिकोलो’ हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पण या चित्रपटांना चांगले थिएटर व स्क्रिन मिळत नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ‘पठाण’ चित्रपटाचा मराठी चित्रपटांवर परिणाम होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनीही भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Video : फटाके फोडले, ढोल-ताशाच्या तालावर बेभान होऊन नाचले अन्…; शाहरुख खानचा ‘पठाण’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी

काय म्हणाले अमेय खोपकर?

अमेय खोपकर म्हणाले, “‘पठाण’ हा हिंदी चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. ‘पठाण’ या चित्रपटाला आमचा विरोध नाही. ‘पठाण’ चित्रपटामधून शाहरुख खानचं कमबॅक झालं आहे. हा चित्रपटही लोकांनी पाहिला पाहिजे. पण गेले चार आठवडे ‘वेड’ हा मराठी चित्रपट चांगली कमाई करत आहे. त्यानंतर ‘वाळवी’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानेही दुसऱ्या आठवड्यामध्ये चांगली कमाई केली. त्यानंतर बांबू, पिकोलो व व्हिक्टोरिया हे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. असे अनेक मराठी चित्रपट आहेत. यामधील एकाही मराठी चित्रपटाला चांगले स्क्रिन किंवा थिएटर मिळत नाहीत. मी याचा निषेध करतो. जर मल्टीप्लेक्स वाल्यांनी मराठी चित्रपटांना चांगल्या स्क्रिन्स व थिएटर दिल्या नाहीत तर मी महाराष्ट्रभर आंदोलन होईल. मराठी चित्रपटांना थिएटर कसे मिळत नाही हे आम्ही तेव्हा बघून घेऊ.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 16:45 IST
Next Story
“वेड चित्रपटासाठी…” ‘सरला एक कोटी’ला स्क्रिन्स आणि प्राईम टाईम शो न मिळाल्याने ईशा केसकर संतापली