scorecardresearch

Premium

‘स्वराज्यरक्षक संभाजी’नंतर शंतनू मोघे पुन्हा एकदा दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

छोटया पडद्यावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत त्याने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं.

ravrambha

गेल्या वर्षी अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. तिला अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. तर या वर्षी देखील काही ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सर्व चित्रपटांची वेगवेगळ्या कारणाने प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यातीलच एक चित्रपट म्हणजे रावरंभा. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता हे नाव समोर आलं आहे.

अभिनेता शंतनू मोघे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी त्याने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेसाठी त्याचं खूप कौतुक झालं. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने ‘रावरंभा’ चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

sanjay-raut-on-devendra-fadnavis-and-eknath-shinde
“वाघनखांनी जसा अफजल खानावर हल्ला झाला तसाच शिंदे-फडणवीस सरकारवरही…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
sudhir mungatiwar indrajit sawant
Video: “लंडनमधील वाघ नखे शिवाजी महाराजांची असतील तर…”, इंद्रजित सावंत यांचं सरकारला थेट आव्हान
subhedar fame director digpal lanjekar announce new marathi movie
“शिवशंभूचा अवतार जणू…”, ‘सुभेदार’नंतर दिग्पाल लांजेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा, पहिली झलक आली समोर
Chhatrapati Sambhajiraje on Lalbaugcha Raja Mandal Rajmudra
लालबागचा राजा मंडळाकडून राजमुद्रेचा अपमान झाल्याचा आरोप, संभाजीराजे म्हणाले…

आणखी वाचा : प्रसाद ओक लवकरच दिसणार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत? प्रसिद्ध दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

याबाबत बोलताना तो म्हणाला, “मी छोटया पडद्यावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. या भूमिकेचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनात असताना आता मोठ्या पडद्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाल्याचा आनंद आहे. ‘रावरंभा’ हा अतिशय भव्यदिव्य व थक्क करणारा चित्रपट आहे. अभिनेता म्हणून मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की, ‘रावरंभा’ चित्रपटात मला शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळतेय. ज्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाने आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, त्यामुळे अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते.”

हेही वाचा : ‘पटकन गाडीतून उतरलो आणि..’; ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील शंतनूची खास पोस्ट वाचाच

शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे. ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. हा चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shantanu moghe will be playing chhatrapati shivaji maharaj role in upcoming ravrambha film rnv

First published on: 18-02-2023 at 18:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×