अलीकडेच अभिनेते शरद पोंक्षे यांना ‘हिंदुत्व के आधारस्तंभ- आचार्य कालिदास पुरस्कार’ या सन्मानानं गौरवण्यात आलं. त्यांच्या हिंदुत्वासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला. या समारंभात शरद पोंक्षेबरोबरच मराठी चित्रपट अभिनेता स्वप्नील जोशी यालाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यानंतर मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी मात्र आक्षेप नोंदवला आहे. या कलाकारांनी हिंदुत्वासाठी असं काय केलं, ज्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यांची ही पोस्ट खूप व्हायरल झाली, त्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी महेश टिळेकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

“पोंक्षे, जोशी या कलाकारांनी हिंदू धर्मासाठी…” मराठी दिग्दर्शकाची टीकात्मक पोस्ट

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

काय म्हणाले होते महेश टिळेकर?

अभिनंदन पोंक्षे, जोशी. नुकत्याच एका संस्थेने जेष्ठ आणि विद्वान अभिनेते शरद पोंक्षे आणि बाल कलाकार ते हिरो असं प्रचंड यश मिळवणारा सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी यांना हिदुत्व आणि हिंदू धर्मासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरव केला. यामुळे या कलाकारांचा अभिमान वाटून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा इतकं कोणतं महान कार्य या कलाकारांनी हिंदुत्वासाठी केलं आहे जे या आधी कुठल्याच कलाकारांना जमलं नाही. कलाकाराला त्याच्या अभिनयासाठी किंवा त्याने समाजासाठी काहीतरी योगदान दिलं म्हणून त्याचा सन्मान, गौरव होतो हे आत्तापर्यंत पाहण्यात आलं होतं. पण कलाकाराला धर्मासाठी म्हणून पुरस्कार देण्यात येतोय हे मी पहिल्यांदाच पाहतोय,” असं महेश टिळेकर यांनी म्हटलंय.

महेश टिळेकर पोस्ट

काय म्हणाले शरद पोंक्षे?

“सातत्याने सावरकर आठवतात, १०० वर्षांपूर्वी ते म्हणाले होते की, मला मुसलमानांची, ख्रिश्चनांची भिती वाटत नाही, मला हिंदूंचीच भिती वाटते, कारण हिंदूच हिंदुत्वाच्या विरोधात उभे राहतात. किती ओळखलं होतं त्यांनी आपल्या समाजाला,” असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शरद पोंक्षे यांची पोस्ट

महेश टिळेकर यांनी फेसबूक पोस्ट केल्यानंतर शरद पोंक्षे यांनी ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही. पण ही पोस्ट अप्रत्यक्षपणे त्यांनी महेश टिळेकरांच्या टीकेला उत्तर देण्यासाठीच केल्याची चर्चा आहे.