अभिनेते शरद पोंक्षे त्यांच्या रोखठोक वक्तव्यमुळे कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते फार सक्रिय असतात. नेहमी त्यांच्या व्याख्याना दरम्यानचे व्हिडीओ शरद पोंक्षे इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करतात. या माध्यमातून माहितीपूर्ण व्हिडीओ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आता त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
शरद पोंक्षे व्याख्यान देण्यासाठी सुविद्य विद्यालयामध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी विद्यालयातील मुलांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर व्याख्यान दिलं. या मुलांबरोबर फोटो शेअर करत त्यांनी एक अनुभव सांगितला. शरद यांचं व्याख्यान ऐकून झाल्यानंतर इयत्ता सहावीमधल्या मुलाची नेमकी काय प्रतिक्रिया होती याबाबत त्यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा – …तरच करीना कपूर खानचा लेक रात्रीचं जेवण जेवतो, २ वर्षांच्या जेहबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली…
ते म्हणाले, “परवा सुविद्य विद्यालयात मुलांसमोर सावरकर समजावून सांगताना… ते व्याख्यान संपलं. त्यानंतर ज्यांनी ही व्याख्यानं आयोजितत केली ते पराग कूलकर्णी यांचा मुलगा ते ऐकायला आला होता. त्याने पाठवलेली प्रतिक्रिया खाली देत आहे”. प्रतिक्रिया वाचून शरद पोंक्षेही भारावून गेले.
व्याख्यान ऐकलेल्या सहावीतील मुलाची प्रतिक्रिया अशी होती की, “काल माझ्या मुलाला त्याच्या आईने विचारलं कसा वाटला कार्यक्रम? त्यांनी क्षणात उत्तर दिलं की, “मला रामायण, कृष्ण व शिवाजी वाचायचा आहे”. आईने विचारलं शरदजी यांच्यासह फोटो का काढला नाही?. अर्जुनने उत्तर दिलं, “मी त्यांचं निरीक्षण करत होतो. इतकी गर्दी होती त्यांच्या भोवती तरीही ते किती नम्र आणि शांत होते”.
“सहावीतला मुलगा काल हे विचार घेवून घरी आला. हे तुमच्या वाणीचं, विचारांचं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्यागाचं फलित आहे. असा परिणाम कालच्या मुलांवर आणि पालकांवर झाला असेल यामध्ये शंकाच नाही. तुमको हमारी उमर लग जाए! हा देश भक्तीच्या विचारांचा वणवा मैलोन मैल पसरवायचा आहे”. शरद पोंक्षे यांच्या या पोस्टला नेटकऱ्यांनीही पाठिबा दिला आहे. तसेच त्यांचं कौतुक केलं आहे.