"न्यूटन मोठाच पण ज्ञानेश्वर माऊली त्यापेक्षा..." शरद पोंक्षेंनी 'तो' व्हिडीओ शेअर करताच नेटकरीही करताहेत कौतुक | sharad ponkshe share video and talk about newton and dnyaneshwar mauli see details | Loksatta

“न्यूटन मोठाच पण ज्ञानेश्वर माऊली त्यापेक्षा…” शरद पोंक्षेंनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच नेटकरीही करताहेत कौतुक

शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करत न्यूटन व ज्ञानेश्वर माऊली यांच्याबाबत भाष्य केलं आहे.

sharad ponkshe sharad ponkshe instagram
शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करत न्यूटन व ज्ञानेश्वर माऊली यांच्याबाबत भाष्य केलं आहे.

मराठी अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय मुदद्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत बेधडकपणे मांडताना दिसतात. त्यांची वक्तव्यं अनेकदा चर्चेत असतात पण याबरोबरच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टही बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “कधी बायको म्हणून…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर नीना कुळकर्णी भावूक, एकत्रित केलेला ‘तो’ चित्रपट ठरला शेवटचा

शरद पोंक्षे यांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये न्यूटन व ज्ञानेश्वर माऊलींबाबत भाष्य केलं आहे. शरद पोंक्षे म्हणाले, “आम्हाला न्यूटन मोठा वाटतो. न्यूटन मोठाच आहे. पण त्याने खाली काय येतं याचा शोध लावला. त्याच्या आधी १२व्या शतकामध्ये १६ वर्षांचं मुल सांगून गेलं खालून वर जाण्याचं किमान त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर.”

“ते फळ वरून खाली येतं पण ते वरपर्यंत जातं कसं? जमिनीमध्ये बी पेरलं जातं. बी पेरल्यानंतर ते बी फुटतं. बी फुटल्यानंतर संपूर्ण कायनात, निसर्ग, पंचमहाभूतं त्याला वाढवण्याची जबाबदारी घेतात. खाली येण्याच्या विरुद्ध दिशेनं ते झाड वाढतं. जमिनीमधून बाहेर येतं. मग ते रोपटं वर वर जातं. कुठे गेला मग तो फळ खाली येण्याचा नियम?”

आणखी वाचा – “समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय?” शरद पोंक्षे म्हणतात…

पुढे ते म्हणातात, “रोपटं वर वर जातं. आकाशाकडे झेपावतं. त्याचा मोठा वृक्ष तयार होतो. मग त्याला फुल, फळं लागतात. मग ते फळ पिकतं व खाली पडतं. त्यानंतर तो न्यूटन येतो. पण आधी आले ज्ञानेश्वर. हे सांगितल्यावर चेहऱ्यावर जे भाव येतात, उर भरून येतो, ज्ञानेश्वर वाचावे असं वाटतं. त्यालाच म्हणतात अस्मिता.” शरद पोंक्षे यांचा या व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीही त्यांचं कौतुक करत आहेत. तसेच अप्रतिम विश्लेषण अशा कमेंट चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडीओवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 20:09 IST
Next Story
“कधी बायको म्हणून…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर नीना कुळकर्णी भावूक, एकत्र केलेला ‘तो’ चित्रपट ठरला शेवटचा