अभिनेते शरद पोंक्षे त्यांच्या अभिनयाशिवाय स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील इतिहासाबद्दल व्याख्याने देत असतात. अलीकडेच त्यांनी ट्विटरवर त्यांच्या व्याख्यानाचा एक छोटा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी राजा छत्रसाल आणि छत्रपती शिवरायांची मैत्री खूप जुनी असल्याचं म्हटलंय. तसेच एका घटनेचा उल्लेख करत बाजीराव पेशवे यांचं कौतुक केलं आहे.

“बाजीराव पेशवे छत्रपतींची गादी बळकावू शकले असते पण…” शरद पोंक्षेंनी सांगितला बाजीरावांचा मोठेपणा

udayanraje bhosale yashwantrao chavan marathi news
“यशवंतराव चव्हाणांनी संपूर्ण आयुष्य जनतेला समर्पित केले”, खासदार उदयनराजेंचे गौरवोद्गार
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
pimpri, dr amol kolhe , shivajirao adhlrao patil, criticise, insulting, artist, lok sabha 2024, shirur constituency, maharashtra politics, marathi news,
‘गोविंदाचे स्वागत अन् मला नाटक्या, नौटंकी…’, डॉ. अमोल कोल्हेंचे शिवाजीराव आढळराव पाटलांना प्रत्युत्तर, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
Dilip Mohite patil,Shivajirao Adhalarao Patil
“आमच्यावर अविश्वास दाखवलात तर…”, पक्षप्रवेशावेळी मोहिते पाटलांचा शिवाजीराव आढळरावांना इशारा

ते व्हिडीओत म्हणतात, “राजा छत्रसाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मैत्री खूप जुनी होती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजा छत्रसाल यांना वचन दिलं होतं की ‘तुझ्या पाठीशी मी कायम उभा आहे, काळजी करू नकोस.’ त्या छत्रसाल राजांनी निरोप पाठवला की ‘मला भीती वाटते, आता मी संपून जाईन.’ नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द बाजीराव पेशव्यांनी पाळला. मध्ये चार पिढ्या गेल्या. एवढ्या पिढ्यांनंतर बाजीराव पेशव्यांनी तो शब्द पाळला आणि छत्रसालांना तिकडे जाऊन वाचवलं. वाचवल्यानंतर दोन तृतीयांश प्रदेश आणि तिथली ९ गावं त्यांना भेट म्हणून मिळाली. हे त्या प्रदेशाचे राजा होऊ शकले असते. पण नाही. स्वामीनिष्ठा काय असते. ती सगळी ९ गावं, दोन तृतीयांश प्रदेश हारून बाजीराव पेशव्यांनी स्वराज्यामध्ये दिला, छत्रपतींच्या गादीला अर्पण केला. खरं तर तो प्रदेश, ती गावं सहज ते घेऊ शकले असते, पण त्यांनी तसं नाही केलं,” असं शरद पोंक्षे या व्हिडीओमध्ये बाजीराव पेशव्यांबद्दल म्हणाले आहेत.

शरद पोंक्षे यांनी या व्हिडीओमध्ये बाजीराव पेशव्यांच्या स्वामीनिष्ठेवर भाष्य केलंय. त्यांनी राजा छत्रसाल यांना मदत करून मिळवलेली गावं आणि प्रदेश स्वतःकडे न ठेवता स्वराज्यामध्ये दिला. जर, तो स्वतःजवळ ठेवला असता, तर त्या प्रदेशाचे ते राजे असते, असंही शरद पोंक्षे म्हणाले आहेत.