‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातील सर्वच कलाकार आज घराघरांत पोहोचले आहेत. त्यांचे कमालीचे विनोद व प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची क्षमता यांमुळे त्यांचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण झाल्याचे दिसते. या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारी अभिनेत्री शिवाली परब(Shivali Parab) आता मंगला या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटात तिने अ‍ॅसिड अटॅक झालेली व्यक्तिरेखा साकारली आहे. आता एका मुलाखतीत चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप केला, असे वक्तव्य तिने केले आहे.

जेवायचे हाल झाले…

अभिनेत्री शिवाली परबने काही दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला मुलाखत दिली. यावेळी चित्रपटातील तिच्या प्रोस्थेटिक मेकअपबद्दल बोलताना तिने म्हटले, “मी अशा मुलाखती पाहिल्या आहेत, जिथे शाहरुखने एखाद्या भूमिकेसाठी असा गेटअप केला किंवा प्रोस्थेटिक मेकअप केला, तर ते आपल्याला सांगत असतात. नवाज सांगत असतात की, असा त्रास होतो. पण, ते खरंच खूप अनुभवलं. तो मेकअप काढल्यानंतरही चार दिवस मला असं वाटायचं की, तो मेकअप अजूनही माझ्या तोंडावर आहे. आऊटडोअर सीन असले किंवा काही नाट्यमय सीन असले, तर मेकअपच्या आतमध्ये घाम यायचा आणि तो चेहऱ्यावर जमा व्हायचा. जेवायचे हाल झाले. पहिलं आमचं लूक टेस्ट झालं तेव्हा मी घाबरलेले. कारण- मी फक्त १५ मिनिटे फोटो काढण्यासाठी मेकअप ठेवला आणि तो निघतच नव्हता. म्हटलं की, मी नाही करणार. मी घाबरले होते. संजय सर म्हणून आमचे मेकअपदादा आहेत. ते मला म्हणाले की, माझ्यावर विश्वास ठेवा. मग नंतर हळूहळू झालं. समस्या हीच असायची की, थोडा मेकअप निघाला की, पुन्हा तो व्यवस्थित करण्यासाठी अर्धा-पाऊण तास लागायचा.”

anil kapoor
अभिनेत्रीचा ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्याबरोबरच्या किसिंग सीनबाबत खुलासा; म्हणाली, “मला रडावे…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
dilip kumar
दिलीप कुमार झोपलेले असताना धर्मेंद्र त्यांच्या घरात घुसले होते; अभिनेते म्हणालेले, “मी घाबरत जिना उतरला अन्…”
Nikhil Bane
“मी घाबरलो…”, निखिल बनेने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील पहिल्या दिवसाचा अनुभव; म्हणाला, “गेट उघडताच…”
Khushi Kapoor
“माझा आत्मविश्वास…”, खुशी कपूरची तिच्या सौंदर्यावरून उडवली जात होती खिल्ली; किस्सा सांगत म्हणाली…
Maharashtrachi Hasyajatra fame shivali parab shares bts video of mangala movie
Video: शिवाली परबने ‘मंगला’ चित्रपटातील ‘तो’ सीन केल्यानंतर दिग्दर्शिकेने जोडलेले हात, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली, “एका श्वासात…”
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”

मंगला हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. हे सर्व करताना ज्यांच्यावर आधारित चित्रपट आहे, त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली, असेही शशांक शेंडे, अलका कुबल यांनी म्हटले. १७ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल व शशांक शेंडेदेखील महत्त्वाच्या भूमिकांत आहेत.

शरीरावर झालेल्या जखमा, ओरखडे आहे तसे चित्रपटात दाखवण्यासाठी प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला जातो.

दरम्यान, शिवालीच्या कामाबद्दल बोलायचे तर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अभिनेत्रीला वेगळी ओळख मिळाली. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरदेखील अभिनेत्री सक्रिय असल्याचे दिसते. ‘फोटोग्राफ्स अ‍ॅण्ड मेमरिज’, ‘पाय इन द स्काय’, वेक अप, ‘व्हॉट्सअप लव्ह’, ‘पिल्लू बॅचलर’, ‘दुश्मन’, ‘चंद्रमुखी’, ‘प्रेम, प्रथा व दुश्मन’, अशा चित्रपट व शोमधून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Story img Loader