मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून श्रेयस तळपदे ओळखला जातो. आपल्या अभिनयाच्या जोरावर श्रेयसने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या श्रेयस त्याचा आगामी चित्रपट ‘ही अनोखी गाठ’मुळे चर्चेत आहे. मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये श्रेयसने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर श्रेयस मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिीडीओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान, नुकतेच श्रेयसने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या करिअरबरोबर वैयक्तिक आय़ुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, या मुलाखतीत त्याने मराठी कलाकारांना हिंदी कलाकार खरंच घाबरतात का? याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- दगडूच्या प्राजूला लागली हळद; होणाऱ्या बायकोचे हळदीचे फोटो पाहून प्रथमेश परब म्हणाला, “चल पटकन…”

श्रेयस म्हणाला, “मराठीतील अनेक कलाकारांच्या मागे नाटकांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ती व्यक्ती कलाकार म्हणून कसलेली असते. त्यामुळे हिंदी कलाकारांना वाटतं की, मराठी कलाकारांबरोबर सीन करताना आपणही तेवढंच सतर्क रहावं. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी कलाकारांना मान असतो, तसेच मराठी कलाकारांना हिंदी कलाकार घाबरूनपण असतात.”

श्रेयसच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत मालिका, नाटक, चित्रपट यांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आला आहे. मराठी बरोबरच बॉलीवूडमध्येही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ओम शांती ओम, हाऊसफुल्ल २, इक्बाल यांसारख्या हिंदी चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून त्याने मराठी टेलिव्हिजनसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता त्याचा अनोखी गाठ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas talpade on why are hindi artists afraid of marathi artists dpj
First published on: 23-02-2024 at 13:42 IST