मराठी मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही महिन्यात आपले जोडीदार निवडत आयुष्याची एक नवी सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. २०२४ मध्ये आतापर्यंत शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरे, तितीक्षा तावडे - सिद्धार्थ बोडके, पूजा सावंत, प्रथमेश परब, योगिता-सौरभ अशा बऱ्याच कलाकारांनी लग्नगाठ बांधली. अशातच आता आणखी एका मराठी अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिल्याचं समोर आलं आहे. लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांचा लेक शुभंकर कलाविश्वात चांगलाच लोकप्रिय आहे. अभिनेत्याने नुकताच एका सोशल मीडिया स्टारसह शेअर केलेला फोटो चर्चेत आला आहे. या फोटोंवर सुनील तावडेंसह असंख्य मराठी कलाकारांच्या कमेंट्स आल्या आहेत. हेही वाचा : “निशाणा तुला दिसला ना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे अन् निखिल बनेचा हटके डान्स, नेटकरी म्हणाले… शुभंकरने सोशल मीडिया स्टार समीक्षा टक्केबरोबर फोटो शेअर करत याला "तुम हो…जेव्हा तुमचा आनंद सांत्वनाची जागा घेतो" असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोवर प्रियदर्शिनी इंदलकर, हृता दुर्गुळे, अमृता खानविलकर, अनघा अतुल, मिताली मयेकर, अमृता देशमुख, सौरभ चौघुले, अक्षर कोठारी, अक्षया नाईक अशा असंख्य मराठी कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. सुनील तावडे यांनी स्वत: सुद्धा या फोटोवर कमेंट करत "रब ने बना दी जोडी, तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा…लव्ह यू… देव तुम्हा दोघांच्या कायम पाठिशी असेल" असं म्हटलं आहे. अभिनेत्याच्या वडिलांनी केलेल्या या कमेंटवरून शुभंकरने समीक्षाबरोबर फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली दिल्याचं स्पष्ट होत आहे. हेही वाचा : Video : गुजराती बांधणी साडीत खुललं नीता अंबानींचं सौंदर्य! लेकाच्या ‘मामेरु’ समारंभात ‘असं’ केलं पाहुण्याचं स्वागत समीक्षा टक्केबद्दल सांगायचं झालं, तर सोशल मीडियावर कॉमेडी, लाइफस्टाइल, फॅशन, स्पोर्ट्स या विषयांवर आधारित व्हिडीओ बनवत असते. तिने शेअर केलेल्या रील्स व्हिडीओला तुफान प्रतिसाद मिळतो. याशिवाय तिने अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतल्या आहेत. सध्या शुभंकर आणि समीक्षावर सध्या संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. हेही वाचा : ठरलं तर मग : पूर्णा आजीने सायलीचा केला स्वीकार! अखेर ‘तो’ भावनिक क्षण आलाच, नातसुनेवर सोपवली मोठी जबाबदारी दरम्यान, शुभंकर तावडेबद्दल सांगायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 'डबलसीट', 'कागर', 'वेड', 'कन्नी' अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्याची 'काळे धंदे' ही वेबसीरिज सुद्धा लोकप्रिय ठरली होती. आता त्याचा आणि समीक्षाचा एकत्र फोटो पाहून दोघांच्या घरी सनई चौघडे केव्हा वाजणार याची सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.