Shweta Mahadik : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या घरी साकारलेल्या बाप्पाच्या सुबक मूर्तीचा अन् सुंदर देखाव्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

‘लोकमान्य’ चित्रपट व काही मालिकांमध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री श्वेता महाडिक सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर श्वेता अनेकदा तिच्या क्रिएटिव्ह आयडिया शेअर करत असते. सेलिब्रिटींचे महागडे कपडे घरच्या घरी किंवा कमीत कमी खर्चात कसे शिवायचे, पर्स कशा बनवायच्या, कानातले, डिझानयर कपडे या सगळ्या टिप्स अभिनेत्री तिच्या व्हिडीओतून चाहत्यांना देते. तिच्या भन्नाट कल्पना शक्तीचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक केलं जातं. मात्र, सध्या श्वेताने साकारलेल्या बाप्पााच्या मूर्तीचं अन् अप्रतिम देखाव्याचं नेटकऱ्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकारांनी भरभरून कौतुक केलं आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
police filed Chargesheet against actor Raj Tarun
गर्भपात करायला भाग पाडलं, फसवणूक केली; एक्स गर्लफ्रेंडने पुरावे दिल्यावर प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात आरोपपत्र दाखल
Vaibhav Tatwawadi
“मी स्मशानात…”, अभिनेता वैभव तत्त्ववादी म्हणाला, “तो अनुभव कधीही विसरणार नाही”
genelia deshmukh shares video of ganpati festival as family celebrates together
Video : देशमुखांच्या घरचा बाप्पा! संपूर्ण कुटुंब एकत्र जमलं अन् मुलांनी केली आरती; जिनिलीयाने दाखवली खास झलक, पाहा व्हिडीओ
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

हेही वाचा : ठरलं तर मग : प्रियाचा डाव फसला! पूर्णा आजीचा ‘तो’ निर्णय अन् प्रतिमा-रविराजसह सायलीने केली बाप्पाची पूजा, पाहा प्रोमो

श्वेता महाडिकने साकारला सुंदर देखावा

श्वेता महाडिकच्या घरी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. परंतु, बाप्पाच्या सजावटीसाठी अभिनेत्रीने गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मेहनत घेतली आहे. तिने घरच्या घरी स्वत:च्या हाताने गणरायाची सुबक मूर्ती घडवली आहे. एवढंच नव्हे, तर यासाठी श्वेताने घरीच जंगलाचा मोठा देखावा तयार केला आहे. या देखाव्यात ससे, हरणं आणि काही झाडं ठेवून सजावट करण्यात आली आहे. हे सगळं अभिनेत्रीने स्वत: तयार केलं आहे.

देखाव्याला जंगलाचं स्वरुप देऊन श्वेताने ( Shweta Mahadik ) साकारलेला बाप्पा त्यात विराजमान झाला आहे. अभिनेत्रीच्या या अफलातून कौशल्याचं सध्या सोशल मीडियावर प्रचंड कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi: “इमेज मातीत मिळवली”, अरबाज पटेलवर भडकला रितेश देशमुख; स्पर्धकांना विचारला ‘तो’ प्रश्न अन्… पाहा प्रोमो

Shweta Mahadik
अभिनेत्री श्वेता महाडिक ( Shweta Mahadik )

हेही वाचा : Bigg Boss Marathi- “निक्की ही आहे तुमची जागा”, रितेशने चांगलंच झापलं; भाऊच्या धक्क्यावरून उठवलं अन् थेट…; ‘त्या’ वक्तव्यावरून मोठा वाद

दरम्यान, सीमा घोगळे, सुकन्या मोने, सुरुची अडारकर, जुई गडकरी, रसिका वेंगुर्लेकर या सगळ्या अभिनेत्रींनी श्वेता महाडिकच्या ( Shweta Mahadik ) व्हिडीओवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.