सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. नुकतीच दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सिद्धार्थ-मितालीने त्यांची पहिली आलिशान गाडी खरेदी केली आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सिद्धार्थने गाडीबरोबरचा खास फोटो शेअर करत लाडक्या बायकोचं कौतुक केलं आहे. सिद्धार्थ-मितालीने गेल्यावर्षी मुंबईत हक्काचं पहिलं घर खरेदी करत आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली होती. यानंतर आता यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालेलं आहे. गाडीबरोबर फोटो शेअर करत अभिनेत्याने या फोटोला "आमची पहिली गाडी…Proud of you बायको! तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!" असं कॅप्शन दिलं आहे. तसेच दुसरीकडे, मितालीने गाडीचा व्हिडीओ शेअर करत "माझी लक्ष्मी आली" असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हेही वाचा : Bigg Boss 17: सलमान खान भर कार्यक्रमात खानजादीवर भडकला! कतरिना कैफने ‘असा’ शांत केला भाईजानचा राग, व्हिडीओ व्हायरल सिद्धार्थ-मितालीने दिवाळीच्या मुहूर्तावर Kia सेल्टोस ही गाडी खरेदी केली आहे. सध्या बाजारात या गाडीची किंमत Financial Express ने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास १०.८९ लाख ते १९.८० लाख (एक्सशोरुम) एवढी आहे. नव्या गाडीचे फोटो पाहून नेटकरी सिद्धार्थ-मितालीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, रसिका वेंगुर्लेकर, नचिकेत लेले, अपूर्व रांजणकर, नम्रता संभेराव, सुखदा खांडकेकर अशा मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.