हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे 'झिम्मा २'बद्दल चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचा टीझर लॉन्च झाल्यावर यातील "मराठी पोरी…" हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हेही वाचा : Naal 2 Review: भावा-बहिणीच्या हृदयस्पर्शी गोष्टीतून मोठ्यांनाही शिकवण देणारा ‘नाळ २’ 'झिम्मा २'च्या पहिल्या गाण्याचे बोल "मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…" असे असून या गाण्यात इंदूच्या ७५ व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. या गाण्याद्वारे चित्रपटातील प्रत्येक स्त्री पात्राच्या स्वभावाची गोष्ट सांगण्यात आली आहे. हे गाणं स्त्रियांवर आधारित असल्याने संपूर्ण गाण्यात आपल्याला गुलाबी रंगाची कपडे, गुलाबी पेस्टल रंगाची सजावट पाहायला मिळत आहे. "मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…" हे गाणं प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्यावर नेटकरी, सिनेविश्वातील अनेक कलाकार रिल्स बनवत आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेही त्याच्या बायको मिताली मयेकरसह "मराठी पोरी…" या गाण्यावर त्याच्या राहत्या घरी भन्नाट डान्स केला आहे. हेही वाचा : “मी १०० टक्के चुकलो”, ‘आदिपुरुष’च्या लेखकाची अखेर कबुली; म्हणाला, “या चित्रपटासाठी ६०० कोटी…” सिद्धार्थ मितालीने दिवाळीनिमित्त घराची सजावट आणि पारंपरिक लूक करून 'झिम्मा २' मधील या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडीओला अभिनेत्याने "मराठी पोरी with मराठी बायको!" असं हटके कॅप्शन दिलं आहे. सिद्धार्थ-मितालीच्या या डान्स व्हिडीओला अवघ्या दोन तासांत अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळत आहे. 'झिम्मा'चा दिग्दर्शक हेमंत ढोमेने सुद्धा सिद्धार्थ-मितालीचा व्हिडीओ रिशेअर करत दोघांचं कौतुक केलं आहे. हेही वाचा : मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी; ‘फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्यासह करणार काम, म्हणाली, “एके दिवशी मी…” दरम्यान, 'झिम्मा २' मध्ये प्रेक्षकांना सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत.