‘क्लासमेट्स’, ‘श्रीदेवी प्रसन्न’, ‘ओले आले’, ‘झिम्मा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अत्यंत कमी वयापासून त्याने सिनेविश्वात काम करायला सुरुवात केली. त्याने ‘अग्निहोत्र’ मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या सगळ्या प्रवासात सिद्धार्थला त्याच्या आईने सुरुवातीपासून खंबीरपणे पाठिंबा दिला.

सिद्धार्थ त्याच्या यशाचं संपूर्ण श्रेय नेहमीच त्याची आई सीमा, त्याची बहीण व बायको मितालीला देत असतो. आईच्या भक्कम पाठिंब्यामुळे आज मी एवढं काही साध्य केल्याचं अभिनेत्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. आज त्याची आई सीमा चांदेकर यांचा वाढदिवस आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त त्याने खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता-सौरभने गुपचूप उरकलेला साखरपुडा, पहिल्यांदाच शेअर केले फोटो अन् सांगितली तारीख

सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची अन् तो मनमोकळेपणाने हसत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देत अभिनेता लिहितो, “आम्ही सर्व समस्या, अडचणी आणि आव्हानांना असेच सामोरे जातो. कठीण काळाचं आम्ही नेहमी असंच स्वागत करू! वाढदिवसाच्याच्या हार्दिक शुभेच्छा आई…तुझ्यावर मी काय प्रेम करत राहीन, #आईचाबर्थडे.”

हेही वाचा : शॉर्ट वनपीस अन्…; सायलीने अर्जुनसाठी बदलला लूक, ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो

दरम्यान, सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोवर सायली संजीव, अमृता खानविलकर, नम्रता संभेराव यांनी कमेंट्स करत सीमा चांदेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सिद्धार्थ नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटात झळकला होता यामध्ये त्याने सई ताम्हणकरबरोबर स्क्रीन शेअर केली होती.