अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरदेखील तो सक्रिय असतो. आता त्याच्या आई सीमा चांदेकर यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय का घेतला, याबाबत वक्तव्य केले आहे.

काय म्हणाल्या सीमा चांदेकर?

सीमा चांदेकर यांनी ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत, मुलं मोठी झाली, सगळं झालं आहे. मग ५७ व्या तुम्हाला का वाटलं की, दुसरं लग्न करावं. त्यावर बोलताना त्यांनी म्हटले, “हा निर्णय घ्यायलादेखील मला खूप वर्षं लागली आणि असं नाहीये की, मुलं सेटल झाली, त्यांचं सगळं झालं आहे. ती माझ्याबरोबर होतीच. त्यामुळे मला एकटेपणा वाटण्याचं काही कारण नव्हतं. तीन वर्षांपूर्वी माझा अपघात झाला, त्यावेळी माझ्या उजव्या हातात प्लेट होती आणि मी कुठेही जाऊ शकत नव्हते. फोन, व्हिडीओ कॉल चालू होते. वेळ मिळाला की, सिद्धार्थ, सुमेधा सगळे येऊन भेटत होते. या वयात लग्न करण्याची काय आवश्यकता आहे, असं म्हटलं जातं. पण मला वाटतं बाकीच्या कुठल्या गरजांसाठी आपण लग्न करीत नाही.”

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Sunny Leone and Daniel Weber renewed their wedding vows
अभिनेत्री सनी लिओनीने डॅनियलशी पुन्हा केलं लग्न, तिन्ही मुलांची उपस्थिती, फोटो आले समोर
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
vidya balan reveals kartik aaryan love life
कार्तिक आर्यन मिस्ट्री गर्लला करतोय डेट. भर शोमध्ये विद्या बालनने केली पोलखोल; म्हणाली, “फोनवर बोलताना…”

पुढे त्यांनी, “अपघात झाल्यानंतर मला कुठेतरी एकटेपणा जाणवला. मला आता सांगायचं आहे की, माझी बाई आज कामावर आली नाही, मला असा असा त्रास झाला, तर या गोष्टी मी सिद्धार्थला फोनवर नाही ना सांगू शकत. कुठल्याही गोष्टी अरे, आज इतकी मजा आली, आज मैत्रिणी आल्या होत्या. मुलं ऐकतात; पण त्यांना वेळ पाहिजे ना. मला ते कुठेतरी हळूहळू जाणवायला लागलं”, असे म्हटले आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18: दीड लाखांचा हिरेजडीत सूट घालून केला भन्नाट डान्स; गुणरत्न सदावर्तेंचा हटके अंदाज पाहिलात का?

जेव्हा सीमा चांदेकर यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सिद्धार्थने त्यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी म्हटले होते. याआधी एका मुलाखतीत सीमा चांदेकर यांनी म्हटले, “लोक काय म्हणतील, असे मला वाटायचे; पण सिद्धार्थने मला धीर दिला. मितालीने आम्ही तुझ्याबरोबर कायम आहोत, असे म्हटले होते. या प्रवासात माझी मुले माझ्याबरोबर होती”, असे म्हणत त्यांनी आपल्या मुलांचा कायम पाठिंबा होता, असे म्हटले आहे.

दरम्यान, सीमा चांदेकर यांनी नितीन म्हसवडे यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या या निर्णयाचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले होते. सीमा चांदेकर या ‘जिवलगा’ या मालिकेत दिसल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, यामध्ये सिद्धार्थचीदेखील महत्वाच्या भूमिकेत होता.