बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपट राज्य करत आहेत. बाई पण भारी देवा या चित्रपटाला प्रचंड यश मिळत आहे. तर आता दुसरीकडे ‘अफलातून’ हा चित्रपट देखील चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांमध्ये किती कमाई केली हा आकडा आता समोर आला आहे.

२१ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, जॉनी लिवर, जेसी लिवर, श्वेता गुलाटी, जयेश ठक्कर, तेजस्विनी लोणारी, विजय भाटकर, भरत दाभोळकर, रेशम टिपणीस हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

आणखी वाचा : “माकड दिसतोय…,” नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेला सिद्धार्थ जाधवचं चोख उत्तर; म्हणाला…

तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्रांची मजेशीर धमाल असणाऱ्या ‘अफलातून’ चित्रपटाला प्रेक्षकांची अफलातून पसंती मिळाली असून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर यांसह विविध शहरांतून सगळ्याच वयोगटांतील प्रेक्षकांनी चित्रपटाचं जोरदार स्वागत केलं आहे.

हेही वाचा : आज लाखो रुपये मानधन आकारणाऱ्या सिद्धार्थ जाधवची पहिली कमाई होती ‘इतकी’ रुपये, खुलासा करत म्हणाला, “ते पैसे मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज तिसऱ्या दिवशीसुद्धा चित्रपटाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ०.९५ कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी २.०३ कोटींची कमाई केली. आठवड्याअखेर ५ कोटींपर्यंत आकडा वाढण्याची शक्यता आहे.