scorecardresearch

‘वेडात मराठे…’मध्ये सत्य मांजरेकरच्या एग्झिटनंतर सिद्धार्थ जाधवची एण्ट्री? गुढीपाडव्यानिमित्त शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

सिद्धार्थने या फोटोला हटके कॅप्शन दिले आहे.

siddharth jadhav in mahesh manjrekar movie
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात सत्य मांजरेकरच्या एग्झिटनंतर सिद्धार्थ जाधवची एण्ट्री?

मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रात सर्वत्र चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक म्हणून गुढीपाडवा असल्याने हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या कोणत्याही नव्या गोष्टीला प्रारंभ करणे, खूप शुभ मानले जाते. सध्या सर्व महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. नुकतंच अभिनेता सिद्धार्थ जाधवने खास फोटो शेअर करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थ जाधव हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने फेसबुकवर एक काही फोटो शेअर केले आहे. या फोटो अनेक मराठी कलाकार हे व्यायाम करताना दिसत आहे. यात अभिनेता हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, जय दुधाणे, सिद्धार्थ जाधव यांच्यासह प्रवीण तरडेही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातून महेश मांजरेकरांचा मुलगा सत्यची एक्झिट? एका व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

सिद्धार्थने या फोटोला हटके कॅप्शन दिले आहे. “गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा. आडवा होई पर्यन्त व्यायाम करून साजरा केला पाडवा…” असे कॅप्शन सिद्धार्थ जाधवने या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : “मी २०१८ पासूनच निश्चित होतो कारण…” महेश मांजरेकरांच्या लेकाने सांगितला पडद्यामागचा किस्सा

दरम्यान त्याने शेअर केलेला फोटो हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या या फोटोत महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील कलाकार दिसत आहे. पण त्या कलाकारांमध्ये सिद्धार्थ जाधव काय करतोय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामुळे सिद्धार्थ जाधवही ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात झळकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तर दुसरीकडे महेश मांजरेकर यांनी स्वत:चा मुलगा सत्य मांजरेकरला या चित्रपटातून काढून टाकल्याचे बोललं जात आहे. आरोह वेलणकर हा सत्य मांजरेकर साकारणार असलेल्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोललं जात आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 12:41 IST

संबंधित बातम्या