Siddharth Jadhav Rinku Rajguru Raksha Bandhan Photos: मराठी सिनेविश्वामध्ये काही कलाकारांनी आपल्याबरोबर काम करणाऱ्या काही कलाकारांना आयुष्यात अगदी महत्त्वाचे स्थान दिले आहे. काहींनी आई, काहींनी मुलगी तर काही कलाकारांमध्ये बहीण-भावाचे नाते तयार झाले आहे. सणाच्या निमित्ताने या मानलेल्या नात्यांमधील जिव्हाळा अनेकदा दिसून येतो. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवने अभिनेत्री रिंकू राजगुरूला त्याची बहीण मानल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सिद्धार्थ व रिंकूने सोशल मीडियावर त्यांचे रक्षाबंधन साजरे केल्याचा फोटो शेअर केला आहे.

सिद्धार्थ जाधवने इन्स्टाग्रामवर रिंकूसह काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रिंकूने सिद्धार्थला राखी बांधली असून पारंपरिक पद्धतीने त्यांनी सण साजरा केला आहे. यावेळी रिंकूने मोती रंगाचा ट्रे़डिशनल ड्रेस परिधान केला असून तिच्या साध्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिद्धार्थ व रिंकूच्या या प्रेमळ नात्यातील जिव्हाळा आणि आपुलकी दिसून आली आहे.

सिद्धार्थ जाधवने व्यक्त केल्या भावना

सिद्धार्थने रक्षाबंधनाचे हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “खारी बिस्कीट…फॉरेव्हर, रिंकूताई खूप प्रेम,” असे लिहीत सिद्धार्थने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर संजय जाधव यांच्या ‘खारी बिस्कीट’ सिनेमातील गाणे लावले आहे. सोशल मीडियावर रिंकू व सिद्धार्थचा फोटो व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यांच्यातील या बहीण-भावाच्या नात्याचे व प्रेमाचे कौतुक केले आहे.

सिद्धार्थ जाधव व रिंकू राजगुरूच्या या फोटोवर एका नेटकऱ्याने लिहिले, “मलासुद्धा रिंकू राजगुरू यांच्याकडून राखी बांधून घ्यायला आवडेल.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “खूपच गोड” अनेकांनी त्यांच्या या फोटोवर रेड हार्ट कमेंट करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

रिंकू व सिद्धार्थ जाधव यांनी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मध्ये केले एकत्र काम

यापूर्वी रिंकू राजगुरू व सिद्धार्थ जाधव यांनी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या सिनेमामध्ये एकत्र काम केले होते. चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती. यानंतर त्यांच्यामध्ये बहीण-भावाचे नाते तयार झाले. मागील वर्षी दोघांनी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले होते. यानंतर पुढेही त्यांनी त्यांच्यातील हा खास बॉण्ड जपला असून यावर्षीही रिंकू राजगुरू व सिद्धार्थ जाधवने रक्षाबंधन साजरे केले आहे.

दरम्यान, सध्या सिद्धार्थ जाधवचे ‘अॅनिमल’ हे धुमाकूळ घालत असून त्याचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोग सुरू आहेत. त्याचबरोबर तो ‘होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचा पाचवा सिझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.