scorecardresearch

Video: जॅकलिन फर्नांडिसने सिद्धार्थ जाधवला दिल्या मराठीत शुभेच्छा, म्हणाली…

या निमित्ताने सर्वांनी जॅकलिनला पहिल्यांदाच मराठीत बोलताना ऐकलं आहे.

Video: जॅकलिन फर्नांडिसने सिद्धार्थ जाधवला दिल्या मराठीत शुभेच्छा, म्हणाली…

सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव हा त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. सर्वजण त्याला त्याच्या आगामी चित्रपटांसाठी शुभेच्छा देत असतानाच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने सिद्धार्थला दिलेल्या शुभेच्छा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. याचं कारण म्हणजे तिने चक्क मराठीतून सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत.

यावर्षी सिद्धार्थ ‘बालभारती’ या मराठी चित्रपटाबरोबर रोहित शेट्टीच्या बहुप्रतीक्षित ‘सर्कस’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सर्कस’ या चित्रपटात तो रणवीर सिंग, जॅकलिन फर्नांडिस यांच्याबरोबरच अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सध्या तो या दोन्ही चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असतानाच सोशल मिडीयावरून त्याने जॅकलिन आणि त्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत जॅकलिन सिद्धार्थला त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल शुभेच्छा देताना दिसतेय.

आणखी वाचा : Video: “हा पिझ्झा तुमच्यासाठी…”; शिल्पा शेट्टीने मुंबईत सुरू केला नवीन कॅफे पण लक्ष वेधलं तिच्या वागणुकीने

या व्हिडीओत सिद्धार्थच्या मागे ती तो म्हणत असलेली वाक्य मराठीत बोलत आहे. सिद्धार्थच्या मागे ती म्हणते, “मी जॅकलिन फर्नांडिस. सिद्धूची मराठी फिल्म येतेय ‘बालभारती’, नक्की बघा. यासोबतच आमचा ‘सर्कस’चा ट्रेलर येतोय तोही बघा. सिद्धू ऑल द बेस्ट !” सिद्धार्थ आणि जॅकलिनचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तूफान व्हायरल होत आहे. हा त्यांचा मजेशीर व्हिडीओ सिद्धार्थच्या चाहत्यांना आवडला असून या निमित्ताने सर्वांनी जॅकलिनला पहिल्यांदाच मराठीत बोलताना ऐकलं आहे.

हेही वाचा : “कोणता हा ॲटीट्युड…!”; अभिजीत खांडकेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सिद्धार्थ जाधव याच्या आगामी ‘बालभारती’ या चित्रपटात सिद्धार्थबरोबर आर्यन मेंघजी, नंदिता पाटकर, अभिजीत खांडकेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे ‘सर्कस’ या चित्रपटात रणवीर सिंगसह जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव, संजय मिश्रा, जॉनी लिवर, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधवसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याचा ट्रेलर २ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून २३ डिसेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 12:41 IST

संबंधित बातम्या