मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सिद्धार्थ जाधवने मराठीपाठोपाठ बॉलिवूडमध्येही काम करण्यास सुरुवात केली. सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. आता सिद्धार्थ एका नव्या कारणाने चर्चेत आला आहे. आज सिद्धार्थची मुलगी इराचा वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या लेकीच्या वाढदिवासानिमित्त सिद्धार्थने एक खास पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सिद्धार्थने पोस्टमध्ये इराबरोबरचे काही फोटो आणि व्हिडिओचे कोलाज बनवून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो आणि इरा मजा करताना दिसत आहेत. सिद्धार्थने पोस्ट करत लिहिलं, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा इरा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बाकी काही नसलं तरी ‘बाबा’ आहे. कायम. सदैव. खुप मोठी हो. आनंदित रहा आणि हे बालपण असच टिकवून ठेव माझ्यात. मला मोठं नाही व्हायचय. तूझ्यासारखं रहायचय. तूझा बाबा सिध्दू. #आपलासिध्दू.”
सिद्धार्थच्या या पोस्टवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. सिद्धार्थने इरासाठी लिहिलेल्या आश्वासक वाक्याचं आता चाहते कौतुक करत आहेत. अनेकांनी सिद्धार्थच्या या व्हिडीओवर कमेंट करत इराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओला पाच तासांत सात हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.