aarya ambekar photo in historical look seeking attention on internet | Loksatta

डोक्यावर पगडी, हातात भाला, ढाल अन्…; गायिका आर्या आंबेकरच्या पोस्टने वेधलं लक्ष

आर्या आंबेकरने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो चर्चेत

डोक्यावर पगडी, हातात भाला, ढाल अन्…; गायिका आर्या आंबेकरच्या पोस्टने वेधलं लक्ष
आर्या आंबेकरच्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (फोटो: आर्या आंबेकर/ इन्स्टाग्राम)

मराठी कलविश्वातील लोकप्रिय गायक आर्या आंबेकर तिच्या सुमधून आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असते. आर्या सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या आर्याने शेअर केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

आर्या आंबेकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन किल्ल्यावरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने जीन्स टॉप असा पोशाख करत डोक्यावर पगडी आणि हातात ढाल-भाला घेतल्याचं दिसत आहे. आर्याच्या या नव्या लूकमधील फोटोंमुळे चाहतेही संभ्रमात पडले आहेत.

हेही वाचा>> Video: “भीमराज की बेटी…” महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेघा घाडगेने शेअर केला खास व्हिडीओ

“एका मॉर्डन स्त्रीच्या आयुष्यातील दिवस. कोकरूप्रमाणे(बकरीचे पिल्लू) सौम्य आणि वाघाप्रमाणे भयंकर ती परिस्थितीनुसार रुप धारण करते” असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. आर्या तिचा नवीन व्लॉग घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> राणादा-पाठकबाईंच्या रिसेप्शन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला अन्…; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> “मी आज अरबाजमुळेच…” पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल मलायका अरोराने केलेलं वक्तव्य चर्चेत

आर्या आंबेकर एक लोकप्रिय गायिका आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून तिला प्रसिद्धी मिळाली. ‘आर्यासा ऑफिशिअल’ या नावाने तिचं युट्यूब चॅनेल आहे. तिचे युट्यूबवर दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असून अनेक व्हिडीओ ती तिच्या चॅनेलवरुन शेअर करत असते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 15:16 IST
Next Story
Video: “भीमराज की बेटी…” महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेघा घाडगेने शेअर केला खास व्हिडीओ