महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा फर्स्ट लूकची झलकही चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्यात दाखवण्यात आली. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार चित्रपटात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांची भूमिका साकारणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर याची बरीच चर्चा रंगली होती.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात ‘बिग बॉस’ फेम उत्कर्ष शिंदेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सात शूरवीरांच्या शौर्यकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात तो सूर्याजी दांडकर ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील त्याच्या लूकचे पोस्टरही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्कर्षचा भाऊ आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक आदर्श शिंदेने उत्कर्षसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. आदर्श शिंदेने चित्रपटातील उत्कर्षच्या लूकचे पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहे.

हेही वाचा >> आलिया भट्टनंतर बिपाशा बासूही गुडन्यूज देण्याच्या तयारीत, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

“हे पोस्टर शेअर करताना खूप आनंद होतोय. पोस्टर प्रदर्शित होऊन वेळ झाला पण मी आज शेअर करतोय. उत्कर्ष शिंदे ही भुमिका साकारण्यासाठी जी मेहनत तू करत आहेस ते बघुन खूप छान वाटतंय. त्यासाठी तुझं विशेष कौतुक. दिवस रात्र ट्रेनिंग सुरू आहे. त्यामुळे तुझं हे काम नक्कीच उत्तम होईल याची खत्री आहे. आम्हा प्रेक्षकांना “सूर्याजी दांडकर” तुझ्या रूपात बघायला मिळणार आहेत. ही भुमिका तू जगणार आहेस आणि या भुमिकेतून तुला जे शिकायला मिळणार आहे, याचा मला भरपूर आनंद आहे. keep it up. आता हा सिनेमा थिएटरमधे जाऊन बघायची उत्सुकता वाढली आहे. तुमच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा”, असं कॅप्शन देत आदर्शने उत्कर्षचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा >> “अपूर्वा नेमळेकर घरात फक्त अभिनय…”, ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या योगेश जाधवचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्कर्ष शिंदे ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वातील टॉप ५ फायनालिस्टपैकी तो एक होता. ‘बिग बॉस’मुळे घराघरात पोहोचलेला उत्कर्ष आता मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहतेही उत्सुक आहेत. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात प्रवीण तरडे, जय दुधाणे, विशाल निकम, सत्या मांजरेकर हे कलाकारही झळकणार आहेत.