स्मिता गोंदकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘पप्पी दे पारुला’ या गाण्यामुळे स्मिता प्रसिद्धीझोतात आली. सध्या अभिनेत्री तिच्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती अनेक मुलाखती आणि कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत स्मिताने लग्नाविषयी खुलासा केला आहे.

हेही वाचा : Video : मिठी मारली अन्…; अनेक वर्षांनी एकत्र दिसले श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर, नेटकरी म्हणाले, “अनन्या…”

Bollywood actress Kareena Kapoor shared a cryptic post
“लग्न, घटस्फोट, चिंता अन्…”, करीना कपूरने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली…
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Living apart together trend
‘Living apart together’ म्हणजे काय? जोडप्यांमध्ये हा ट्रेंड का वाढतोय?
Viral Video Of Husband and wife
‘कोणाचीही पर्वा न करता…’ बायकोला नाचताना पाहून ‘त्याने’ही धरला ठेका; व्हायरल VIDEO नक्की बघा
Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”
transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
tina datta talks about being single mother
३३ वर्षीय अभिनेत्री लग्न न करताच आई होणार? म्हणाली, “पतीवर अवलंबून राहणं…”
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”

स्मिता गोंदकर म्हणाली, “‘बिग बॉस मराठी’नंतर मला अनेकांनी लग्नासाठी मागणी घातली होती. पण, मी नेहमीच सर्वांना नकार दिला. माझ्याकडे एखादी व्यक्ती आकर्षित होतेय असं मला वाटलं की, लगेच मी स्वत:ला सावरते. मला आता अजिबात लग्न करायचं नाही आहे.”

हेही वाचा : “वर्षा बंगल्यात शिरताना मनात…”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “मुख्यमंत्री म्हणून यांच्या हातून…”

“आजच्या काळात आपण कोणत्याच गोष्टीची शाश्वती देऊ शकत नाही. लग्नानंतर गोष्टी पटकन बदलत जातात आणि त्या सगळ्या बदलासाठी मी तयार नाही. त्यापेक्षा आपण मैत्री ठेवूया असं माझं म्हणणं असतं. मी खूप चांगली मैत्री निभावते पण, रिलेशनशिप वर्क होत नाही असं मला वाटू लागलंय. याचं कारण म्हणजे माझा सगळा वेळ रिलेशनशिप सांभाळण्यात जातो… अगदी करिअरवर सुद्धा लक्ष राहत नाही. या गोष्टी मला जाणवल्या आहेत. याबाबत मी माझ्या आईला सुद्धा समजावलं आहे. ‘माझं लग्न झालेलं आवडेल की मी आनंदी राहिलेलं तुला आवडेल?’ असा प्रश्न मी आईला विचारला होता. तेव्हा ती सुद्धा तुझं आनंदी असणं महत्त्वाचं आहे असं म्हणाली होती. त्यामुळे लग्न आता अजिबात नको.” असं स्मिताने सांगितलं.

हेही वाचा : “५ वर्षांचा दुरावा आता संपणार”, नेहा पेंडसेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

लग्नाविषयी स्पष्ट मत मांडत स्मिता पुढे म्हणाली, “मी जरा आता खूपचं स्पष्ट बोलते…माझं मत काही लोकांना पटणार नाही. पण, लग्न झालं की खूप तडजोडी कराव्या लागतात आणि त्यासाठी माझं मन कधीच तयार होणार नाही. सुरुवातीला त्या तडजोडींचं काही वाटत नाही…काही काळाने त्या गोष्टी जाणवू लागतात आणि मला सध्या कोणतीही तडजोड करायची नाही. त्यामुळे एकतर तुम्ही लग्न शकता किंवा आनंदी राहू शकता. मला आता आनंदी राहायच आहे.” दरम्यान, स्मिता गोंदकर महत्त्वाच्या भूमिकेत असलेला ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader