महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. लवकरच सोनाली कुलकर्णीचा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'होऊ दे चर्चा…कार्यक्रम आहे घरचा' असं सोनालीच्या नव्या कार्यक्रमाचं नाव असून 'सन मराठी' वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. ४ ऑगस्टपासून दर रविवार ९ वाजता सोनालीचा हा नवाकोर कार्यक्रम सुरू होतं आहे. त्यामुळे सध्या सोनाली चर्चेत आहे. अशातच सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी तिला 'बालिशपणा', 'पागल' असं म्हटलं आहे. पण या नेटकऱ्यांना सोनालीने चांगलंच उत्तर दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर एका सेकंदाच्या व्हिडीओचा ट्रेंड सुरू आहे. त्याच ट्रेंडला फॉलो करत सोनाली कुलकर्णीने ( Sonalee Kulkarni ) एक व्हिडीओ केला आहे. सोनालीचा हा व्हिडीओ फोटोग्राफर शशांक सानेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या एका सेकंदाच्या व्हिडीओमध्ये सोनाली आपला सुंदर नेकलेस दाखवताना दिसत आहे. पण अनेकांना ते खटकलं आहे. हेही वाचा - Video: सिद्धार्थ आनंदच्या वाढदिवसाच्या पार्टीतील शाहरुख खानच्या जबरदस्त लूकने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ हेही वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! तीन वर्षांनंतर Squid Game 2 वेब सीरिज प्रेक्षकांच्या येणार भेटीस, प्रदर्शनाची तारीख… सोनालीच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने "बालिशपणा" अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर सोनालीने चांगलंच उत्तर दिलं. ती म्हणाली, "जपायला हवा". दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, "तू काय दाखवू इच्छिते." त्यावर सोनाली म्हणाली, "नेकलेस. भाईसाहेब आपल्याला काय वाटलं." तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने अभिनेत्रीला थेट "पागल" म्हटलं आहे. तरीही सोनालीने आपल्या खास अंदाजात नेटकऱ्याला उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, "थोडा गरजेचा आहे ना." सोनालीने ( Sonalee Kulkarni ) नेटकऱ्यांना दिलेल्या या उत्तराने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. Sonalee Kulkarni Comments हेही वाचा - Video: अमेरिकेहून सुट्टी एन्जॉय करून लाडक्या लेकीसह मुंबईत परतील ऐश्वर्या राय-बच्चन, नेटकरी म्हणाले, “ही शाळेत जात नाही का?” दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या ( Sonalee Kulkarni ) कामाबद्दल बोलायचं झालं, तर याचवर्षी सोनालीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली. २५ जानेवारीला सोनालीचा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं. आता लवकरच ती ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सोनाली स्वराज्य सौदामिनी छत्रपती ताराराणी या मुख्य भूमिकेत झळकणार आहे.