मराठी कलाविश्वाची ‘अप्सरा’ म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं. आजवर तिने ‘नटरंग’, ‘मितवा’, ‘हिरकणी’, ‘क्लासमेट्स’, ‘तमाशा’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. सोनाली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अभिनेत्रीला तिच्या हटके अंदाजासाठी ओळखलं जातं. सोनाली दमदार अभिनेत्री तर आहेच परंतु, याशिवाय ती एक उत्तम नृत्यांगणा सुद्धा आहे.

सोनालीने आजवर अनेक कार्यक्रमांमध्ये लाइव्ह परफॉर्मन्स केले आहेत. तिच्या डान्सची चर्चा नेहमीच होत असते. नुकतीच अभिनेत्री आशा भोसलेंच्या एका जुन्या गाण्यावर थिरकली आहे. यावेळी तिच्या सोबतीला प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटीलने डान्स केला. सोनाली आणि आशिषचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी दोघांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ चित्रपटात छगन भुजबळ व गुणरत्न सदावर्तेंची भूमिका कोण साकारणार? अखेर नावं आली समोर

ज्येष्ठ लोकप्रिय गायिका आशा भोसले यांच्या “येऊ कशी प्रिया…” या गाण्यावर सोनाली कुलकर्णीने सुंदर असा डान्स केला आहे. “स्टेजवर सादरीकरण करण्यापूर्वी खुद्द कोरिओग्राफरबरोबर व्हॅनिटी व्हॅनमध्ये डान्स केला” असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे. यावेळी सोनालीने काळ्या रंगाचा अन् बाजूने त्याला गोल्डन बॉर्डर असलेला सुंदर असा नेट ड्रेस घातला होता.

हेही वाचा : “ती माझी एकुलती एक मुलगी आहे अन्…”, सोनाक्षी-झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले?

सोनालीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरने या व्हिडीओवर “तू खूपच सुंदर दिसत आहेस” अशी कमेंट केली आहे. तर, अन्य काही नेटकऱ्यांनी “झक्कास जबरदस्त एक नंबर”, “क्या बात है”, “खूपच सुंदर”, “नाद फक्त तुमचाच”, “वाह वाह” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा : “डाएट वगैरे भारतातच ठेऊन आलो”, मुग्धा-प्रथमेशची काठमांडू सफर, घेतला नेपाळी पदार्थांचा आस्वाद

दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मल्याळम सिनेसृष्टीत काम केलं. यामध्ये तिने सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. अवघ्या सहा महिन्यांत सोनालीने या चित्रपटासाठी शूटिंग पूर्ण केलं होतं. याशिवाय लवकरच ती मोठ्या पडद्यावर ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तिने यापूर्वी ऐतिहासिक भूमिका साकारलेल्या ‘हिरकणी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.