मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयासह फॅशनमुळे चर्चेत असते. सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असून तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतेच अभिनेत्रीने तिचे वेस्टर्न ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आकाशी रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये सोनालीचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय. अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. अनेकांनी तिच्या या ग्लॅमरस लूकसाठी तिचं कौतुक केलंय. पण या पोस्टमध्ये लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे फोटोला दिलेलं कॅप्शन.

हेही वाचा… आमिर खानने नाकारला होता महेश कोठारेंचा ‘हा’ चित्रपट, किस्सा सांगत म्हणाले, “माझ्या डोक्यात वेड्यासारखा विचार…”

“शरीरामुळे ट्रोल झालेल्या सर्व महिलांसाठी – जाड किंवा बारीक असणं ही तुमची निवड आहे. आपल्या शरीरावर प्रेम करणं हा आपला अधिकार आहे. मत मांडणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. तुमच्या आनंदाला प्राधान्य द्या.” असं जबरदस्त कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोला दिलं आहे. “ट्रोल करनेवाले कभी डरते नाही” असंही सोनालीने यात लिहिलं आहे.

आजच्या या ऑनलाईन जगात अभिनेत्रींपासून सामान्य स्त्रियांनादेखील त्यांच्या शरीरयष्टीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक स्त्रियांना मानसिक तणाव तर येतोच, पण काहीजणी त्यांचा आत्मविश्वासदेखील गमावून बसतात. अशा स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सोनालीने तिच्या कॅप्शनद्वारे बॉडी शेमिंगवर आवाज उठवला आहे. ट्रोलिंगचा परिणाम होऊ न देता स्त्रियांनी स्वत:वर प्रेम करायला शिकायला हवं असा सुंदर संदेश आणि मोलाचा सल्ला अभिनेत्रीने या कॅप्शनद्वारे दिला आहे.

हेही वाचा… …अन् वरुण धवनने खेचून घेतला पापाराझीचा फोन; अभिनेत्याचा VIDEO व्हायरल होताच नेटकरी म्हणाले…

सोनालीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. व्हायरल झालेली पोस्ट पाहताच चाहत्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “तुमचं कॅप्शन वाचून मला आनंद झाला. तुम्ही सर्व ट्रोलर्सच्या कानशिलात लगावलीत.” असं कॅप्शन एका चाहतीने लिहिलं आहे. तर एका युजरने कमेंट करत लिहिलं, “उगाच तुम्हाला अप्सरा नाही म्हणत.”

हेही वाचा… ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम ईशा केसकरने ‘पुष्पा-२’ च्या गाण्यात आणला ट्विस्ट, डान्स व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, मोहनलाल अभिनीत ‘मलाइकोट्टई वालीबान’ या मल्याळम चित्रपटात सोनाली शेवटची झळकली होती. लवकरच सोनालीचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर ‘रावसाहेब’, ‘रेनबो’ या चित्रपटांमार्फत ती लवकरत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.