Premium

“शिवशंभूचा अवतार जणू…”, ‘सुभेदार’नंतर दिग्पाल लांजेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा, पहिली झलक आली समोर

शंभूराजांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर, ‘सुभेदार’नंतर दिग्पाल लांजेकरांचा नवा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

subhedar fame director digpal lanjekar announce new marathi movie
'सुभेदार'नंतर दिग्पाल लांजेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ आणि अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘सुभेदार’ या शिवराज अष्टक मालिकेतील सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शिवराष्ट अष्टक मालिकेतील चित्रपटांचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. आता नुकतीच त्यांनी एका नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, विसर्जन मिरवणुकीत सायलीवर होणार प्राणघातक हल्ला, प्रोमो आला समोर

मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात, म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून अलीकडच्या तरुणाईला छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पराक्रमाची माहिती मिळेल. “उजळला तेजाने, पुरंदराचा माथा. सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा. शत्रू होई परास्त, असा ज्याचा गनिमी कावा. शिवशंभूचा अवतार जणू अवतरला ‘शिवरायांचा छावा’” असं कॅप्शन देत दिग्पाल लांजेकर यांनी नव्या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे.

हेही वाचा : ललित प्रभाकरचा हॉट लूक, बॅचलर ट्रिपऐवजी तीर्थयात्रा अन्…; ‘शांतीत क्रांती २’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

“छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर साकारायला मिळणं हे माझे परमभाग्यच आहे असे मी मानतो”, या शब्दांत लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करताना भावना व्यक्त केल्या. चित्रपटाची पहिली झलक शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी संपूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : अखेर स्वप्न सत्यात उतरलं! किरण मानेंनी खरेदी केली आलिशान मर्सिडीज; गाडीची खास झलक दाखवत म्हणाले…

दरम्यान, ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र आणि मृणाल कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून हा चित्रपट पुढील वर्षी १६ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Subhedar fame director digpal lanjekar announce new marathi movie shivrayancha chhava release on 16th feb next year sva 00

First published on: 25-09-2023 at 12:55 IST
Next Story
सुपरहीट मराठी चित्रपट ‘सुभेदार’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर; वाचा कुठे पाहायला मिळणार?