'कट्यार काळजात घुसली'ला ७ वर्ष पूर्ण होताच सुबोध भावेची मोठी घोषणा, पुन्हा प्रेक्षकांना देणार सांगीतिक मेजवानी | Subodh bhave announced his next musical film after katyar kaljat ghusli | Loksatta

‘कट्यार काळजात घुसली’ला ७ वर्ष पूर्ण होताच सुबोध भावेची मोठी घोषणा, पुन्हा प्रेक्षकांना देणार सांगीतिक मेजवानी

हा चित्रपट मराठी रंगभूमीवर गाजलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकावर आधारित होता.

subodh

काल १२ नोव्हेंबर रोजी ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन सात वर्षे झाली. २०१५ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तुफान गाजला. या चित्रपटामुळे नवीन पिढीलाही नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड लागली. आजही हा चित्रपट प्रेक्षक तितक्याच आवडीने बघतात. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सात वर्षे पूर्ण झाल्याचे अवचित्य साधून सुबोध भावे यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

हा चित्रपट मराठी रंगभूमीवर गाजलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकावर आधारित होता. या नाटकला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या नाटकावर आधारित असलेला ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपटही तितक्याच उत्कृष्ट दर्जाचा बनला. सुबोध भावेच्या करिअरमधील हा चित्रपट अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. या चित्रपटात सुबोधने फक्त प्रमुख भूमिकाच साकारली नव्हती तर याचे दिग्दर्शनही त्यानेच केले होते. आता या चित्रपटाला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुबोधने एक खास पोस्ट लिहिली आहे.

आणखी वाचा : “…म्हणून माझा मुलगा चित्रपटसृष्टीपासून असतो दूर”; अक्षय कुमारने स्पष्ट केले कारण

सुबोधने कट्यार काळजात घुसलीचं एक पोस्टर शेअर करत लिहिलं, “कट्यार काळजात घुसली…१२ नोव्हेंबर २०१५… एका संगीतमय आनंददायी प्रवासाचे सातवे वर्ष. संगीत माणसं जोडतं आणि आनंद निर्माण करतं! अजून एक आनंददायी संगीतमय प्रवास पुढील वर्षी. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद…” सुबोधच्या या पोस्टमुळे सर्वजण आनंदी झाले.

हेही वाचा : “मी ज्यांना प्रपोज केलं त्यांनी…”; सायली संजीवचा प्रेमाबद्दल मोठा खुलासा

सुबोध लवकरच अजून एक सांगीतिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे याची घोषणा त्याने या निमित्ताने केली. त्याच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत त्याला मनोरंजन सृष्टीतील त्याच्या मित्र मंडळींनी, त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोधच्या या पोस्टनंतर हा आगामी चित्रपट कोणता असेल, ‘कट्यार काळजात घुसली’ नंतर पुन्हा एकदा तो एखादं अजरामर नाटक चित्रपट रूपातून घेऊन येणार का, त्यात कोण कलाकार असतील, हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-11-2022 at 19:22 IST
Next Story
“मराठी चित्रपट दुर्दैवाने…” सुयश टिळकची ‘ती’ पोस्ट चर्चेत