scorecardresearch

Phulrani Trailer : डॅशिंग अंदाज, गावरान ठसका अन्…; सुबोध भावे व प्रियदर्शनीच्या ‘फुलराणी’चा ट्रेलर प्रदर्शित, विक्रम गोखलेंची दिसली झलक

सुबोध भावेच्या ‘फुलराणी’ चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

phulrani marathi film phulrani trailer
सुबोध भावेच्या 'फुलराणी' चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

गेल्या काही दिवसांपासून सुबोध भावेच्या ‘फुलराणी’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये कोणती अभिनेत्री आहे याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकर ‘फुलराणी’मध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं. आता या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर प्रियदर्शनीने सोडंल मौन, म्हणाली, “मैत्री वाढली आणि…”

सुबोधच्या संवादानेच चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. त्यानंतर शेवंता तांडेल म्हणजेच प्रियदर्शनीची एण्ट्री होते. ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेण्यापासून ते या कॉन्सेस्टची विजेती होण्यासाठी शेवंताची चाललेली धडपड या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. प्रियदर्शनीची अगदी बिनधास्त भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – “हे तुला शोभतं का?” विद्या बालनचं न्यूड फोटोशूट, ‘तो’ फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा राग अनावर

पाहा ट्रेलर

ट्रेलरमधील प्रियदर्शनीची झलक लक्ष वेधून घेणारी आहे. विशेष म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचीही या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. ट्रेलरमध्येही त्यांची झलक पाहायला मिळत आहे. तर सुबोध यामध्ये विक्रम ही भूमिका साकारताना दिसणार आहे. सुशांत शेलारचाही लूक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – नवाजुद्दीन सिद्दीकीचा संसार मोडला, घटस्फोटाबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून…”

सोशल मीडियावर ‘फुलराणी’च्या ट्रेलरला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळत आहे. विक्रम गोखले यांच्या भूमिकेचं सगळेच जण कौतुक करत आहेत. तर प्रियदर्शनीची भूमिकाही प्रेक्षकांना आवडत आहे. जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या २२ मार्चला ‘फुलराणी’ सर्वत्र प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 13:36 IST