Premium

“तिने जास्त दारू प्यायली आहे…,” डान्समुळे ट्रोल करणाऱ्याला सुकन्या मोनेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…

‘बाईपण भारी देवा’च्या यशाबद्दल मध्यंतरी एका सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यात अभिनेत्री सुकन्या मोने यांनी दिलखुलासपणे डान्स केला.

Sukanya troll

‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल झाले. या चित्रपटाने ९० हून अधिक कोटींची कमाई केली. या चित्रपटाच्या यशाबद्दल मध्यंतरी या एका सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यात अभिनेत्री सुकन्या मोने यांनी दिलखुलासपणे डान्स केला. पण आता त्या डान्समुळे ट्रोल करणाऱ्या एकाला त्यांनी सडेतोड उत्तर देत गप्प केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : दोन दिवसांत पिंपल घालवायचेत? सुकन्या मोनेंनी सांगितला सोपा घरगुती उपाय, म्हणाल्या…

या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तो आनंद सेलिब्रेट करण्यासाठी काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी आणि या चित्रपटाच्या टीमने एक खास पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीला दिग्दर्शक केदार शिंदे, या चित्रपटातील सगळे कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ, कलाकारांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी सर्व कलाकारांनी या चित्रपटाबद्दलचे त्यांचे अनुभव सांगितले. तर यानंतर सगळ्यांनी प्रसिद्ध मराठी गाण्यांवर ताल धरला.

हेही वाचा : “आज तू सातासमुद्रापार…” लेकीच्या वाढदिवशी सुकन्या मोने भावूक, पोस्ट चर्चेत

या दरम्यान सुकन्या मोने यांच्या नृत्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. त्या सगळ्या हिट गाण्यांचा, चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आनंद घेत नाचल्या. तेव्हा त्यांच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवर एका नेटकर्‍याने कमेंट लिहिली, “ती खूप दारू प्यायली आहे.” त्यावर सुकन्या मोने यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं, “संगीताची नशा, यशाची नशा आहे ही बाकी काही नाही.” तर आता सुकन्या मोने यांनी ट्रोलरला दिलेलं हे उत्तर खूप चर्चेत आलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sukanya mone gives reply to troller who trolls her for her dance at baipan bhari deva success party rnv

First published on: 30-09-2023 at 16:02 IST
Next Story
Video: “माझे बाबा शंकर भगवान अन् आई…” क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल