Swapnil Joshi special welcome by kids: स्वप्नील जोशी चित्रपट व नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. सध्या त्याची प्रमुख भूमिका असलेले लग्नपंचमी हे नाटक लोकप्रिय ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय असतो.
आता स्वप्नील जोशीने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तो जेव्हा दौऱ्यांवरून खूप दिवसांनी घरी येतो, त्यावेळी त्याची मुले त्याचं कसं स्वागत करतात, हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
स्वप्नील जोशीच्या मुलांना पाहिलंत का?
स्वप्नीलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, स्वप्नील घराची बेल वाजवतो. बेलचा आवाज ऐकून त्याची मुलगी मायरा पळत येते, दरवाजा उघडते आणि त्याला मिठी मारते. त्यानंतर त्याचा मुलगाही पळत येतो आणि त्याला मिठी मारतो. स्वप्नील दोघांचेही लाड करत असल्याचे पाहायला मिळते.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की स्वप्नीलचा मुलगा राघव म्हणतो की तू खूप दिवसांनंतर घरी आला आहेस ना, तर आम्ही तुला सरप्राइज देणार आहे. त्यानंतर मायरा म्हणते की मी दोन पेंटिंग बनवले आहेत. एकावर फुले दिसतात आणि दुसऱ्यावर सिंहाचे चित्र पाहायला मिळते. त्यानंतर ती स्वप्नीलला विचारते की तुला कोणतं पेटिंग हवं आहे? त्यावर स्वप्नील म्हणतो की तू म्हणशील ते मी घेईन. त्यावर मायरा सिंहाचे चित्र त्याला देते.
तर राघवने गाडीचे चित्र बनवल्याचे दिसते. स्वप्नील ते पाहून आनंदी होतो. दोघांचेही कौतुक करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत स्वप्नीलने लिहिले, “जेव्हा तुम्ही कामाच्या ट्रिपवरून परत येता, त्यावेळी तुमची मुलं असं स्वागत करतात. प्रत्येक वेळी ते असं स्वागत करतात.”
पुढे त्याने असेही लिहिले, “मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?” स्वप्नीलच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. “हा खरा आनंद असतो”, “हा आनंद वेगळा असतो”, “बाहेर सेलिब्रिटी पण घरात बाबा”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, स्वप्नीलच्या या व्हिडीओवर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केलं आहे.
