Swapnil Joshi Shares Video: अभिनेता स्वप्नील जोशी विविध कारणांनी चर्चेत असतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक खास गोष्ट पाहायला मिळते. स्वप्नील जोशी खूप दिवसांनी त्याच्या घरी गेल्यानंतर त्याची मुले त्याला सरप्राईज देत असल्याचे दिसत आहे. आता हे सरप्राईज कोणते, ते जाणून घेऊ…
स्वप्नील जोशींच्या मुलांनी केले खास पद्धतीने स्वागत
मायरा असे त्याच्या मुलीचे आणि राघव असे त्याच्या मुलाचे नाव आहे. स्वप्नील घरी आल्यानंतर राघव म्हणतो, “बाबा तू खूप दिवसांनी आला आहेस? तर आम्ही तुझ्यासाठी आमच्या खोलीत एक सरप्राईज तयार केलं आहे.”
मायरा म्हणते की, तू म्हणतोस तुला गोष्टी जागच्या असलेल्या, स्वच्छ असलेल्या, आवरलेल्या आवडतात. तर त्यावर स्वप्नील ‘हो’ म्हणतो. तसेच तो मुलांबरोबर जातो. मायरा व राघव त्यांच्या खोलीचे दार उघडतात आणि वेलकम, असे म्हणून त्याचे स्वागत करतात.
खोलीत सुंदर लाईट्स लावतात. त्यानंतर ते दोघे स्वप्नीलला आवरलेली खोली दाखवतात. त्यांचा अभ्यासाचा टेबल, बेड, पुस्तकं सर्व काही व्यवस्थित असल्याचे दिसत आहे. अभ्यासाच्या टेबलवर स्वामी समर्थांचा फोटो दिसत आहे. व्हिडीओमध्ये पुढे मायरा व राघव त्यांची मेडल्सदेखील दाखवत असल्याचे पाहायला मिळते.
तसेच, शेवटी राघव त्याची बॅग उघडतो, त्यातील एक पदक काढून तो स्वप्नीलला दाखवतो. मग स्वप्नीलही मायरा व राघवचे कौतुक करतो. खोली खूप सुंदर आवरली असल्याचेदेखील तो त्यांना सांगतो. तसेच, मला आवडले आहे, हेदेखील तो म्हणत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये शेवटी पुन्हा सुंदर लाईट्स पाहायला मिळतात.
हा व्हिडीओ शेअर करत स्वप्नीलने लिहिले, “जिथे स्वच्छता असते तिथे देव असतो.” पुढे त्याने लिहिले की, मायरा व राघवने घरात माझं उत्तम पद्धतीनं स्वागत केलं. दिवसाचा शेवट करण्यासाठी आवरलेली खोली ही उत्तम गोष्ट आहे.
नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
स्वप्नील जोशीने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काही कलाकारांनीदेखील कमेंट्स केल्या आहेत. “निरागस”, “क्यूट”, “खूप छान”, “वाह! किती गोड”, “कसली गोड गडबड आणि बडबड, प्रेम”, “खूपच छान, सुंदर. तुमची गुणी मुलं आणि त्यांची सुंदर रूम”, “गोड मुलं”, “स्वप्नील दादा, हेच खरं सुख असतं. स्वप्नील दादा तुझं मुलांशी असलेलं बॉण्डिंग खूपच छान आहे”, “गुणी बाळ”, “गोंडस”, “बापरे, किती मस्त”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.




स्वप्नील जोशी सध्या लग्नपंचमी या नाटकामुळे चर्चेत आहे. निपुण धर्माधिकारी यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे; तर मधुगंधा कुलकर्णीने ते लिहिले आहे. अमृता खानविलकर या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे.
दरम्यान, स्वप्नील अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारत असल्याचे दिसतो. आता आगामी काळात तो कोणत्या प्रकल्पामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
