scorecardresearch

Premium

“अचानक मोठी झाली यार…”; लेकीसाठी पोस्ट लिहीत स्वप्निल जोशी भावूक

ही पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.

swapnil joshi

मराठी मनोरंजन सृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता स्वप्निल जोशी याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा सगळ्याच माध्यमातून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घडामोडीही सोशल मीडियावर सक्रिय राहत चाहत्यांची शेअर करत असतो. आता त्याच्या लेकीचा एक फोटो शेअर करत तो भावूक झालेला दिसला.

स्वप्निल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. स्वप्निल त्याच्या कुटुंबियांबरोबर मजा मस्ती करत असतो. तो जितका चांगला अभिनेता आहे तितकाच चांगला वडीलही आहे. स्वप्निल बऱ्याचदा आपल्या मुलांसोबत नेहमीच वेळ घालवताना दिसून येतो. दरम्यान स्वप्निल जोशीने त्याच्या लेकीसाठी एक खास पोस्ट केली. ही पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.

Ketaki Mategaonkar crush is johnny depp
केतकी माटेगावकरचा ‘हा’ हॉलीवूड स्टार आहे क्रश; म्हणाली, “त्याला मराठी अंदाजात प्रपोज करेन…”
rutuja bagwe decorated her new home as per london theme
नेमप्लेटवर आई-बाबांचं नाव, लंडनची थीम अन्…; ‘असं’ सजवलं ऋतुजा बागवेने नवीन घर; म्हणाली…
rinku rajguru
Video “कधीही विसरता न येणारा प्रवास”; रिंकू राजगुरुने शेअर केला केदारनाथ ट्रीपचा अनसिन व्हिडिओ, म्हणाली…
ketaki mategaonkar work with south superstar allu arjun
मराठमोळ्या केतकी माटेगावकरचं नशीब उजळलं; सुपरस्टार अल्लू अर्जुनबरोबर झळकली जाहिरातीत, अनुभव सांगत म्हणाली…

आणखी वाचा : स्वप्निल जोशी ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या एका भागासाठी आकारतो ‘इतके’ मानधन, किंमत ऐकून व्हाल थक्क

स्वप्निलने त्याची मुलगी मायराचं एक रील शेअर केलं. यामध्ये ती इरकली साडी नेसलेली दिसत असून तिने पारंपारिक दागिने परिधान केले आहेत. हे रील शेअर करत स्वप्निलने लिहिलं, “अचानक मोठी झाली यार.” ही पोस्ट शेअर करताना तो भावूक झालेला दिसला.

हेही वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

स्वप्निलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी तसेच मनोरंजन सृष्टीतील त्याच्या मित्रमंडळींनी कमेंट करत मायराचं कौतुक केलं आहे. त्याचप्रमाणे “तुझ्या भावनांशी आम्ही सहमत आहोत,” असंही अनेकांनी सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swapnil joshi shared special post for his daughter rnv

First published on: 08-01-2023 at 13:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×