भारतीय संघाने टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरत कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. विराट कोहलीची फलंदाजी, सूर्यकुमार यादवचं अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-२० चॅम्पियन ठरला आहे. सध्या सर्व स्तरांतून टीम इंडियाचं कौतुक करण्यात येत आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला आहे. भारतीय संघाने मोठ्या प्रतीक्षेनंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरल्यामुळे सध्या सर्व स्तरांतून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. संघातील सगळेच खेळाडू सामना जिंकल्यावर मैदानात भावुक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. याचप्रमाणे टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यावर भारतीय चाहत्यांचे डोळेही आनंदाने भरून आले होते. मराठी कलाविश्वातील कलाकारांनी देखील या मॅचचा आनंद घेतला. सोनाली कुलकर्णी, हृषिकेश जोशी, सई ताम्हणकर, पुष्कर जोग, प्रसाद ओक, पृथ्वीक प्रताप अशा सगळ्याच मराठी कलाकारांनी टीम इंडियाचं कौतुक करण्यासाठी पोस्ट शेअर केल्या आहेत. हेही वाचा : Ind vs SA T20 World Cup Final: हार्दिक पंड्या भावुक होत म्हणाला, ‘गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात बरंच काही घडलं…..पण माझा दिवस येईलच याची खात्री होती’… हृषिकेश जोशी लिहितात, "एका मॅचला इतके टर्निंग पॉईंट्स कोहली, अर्शदीप, बुमराह, सूर्या अफाट…" याशिवाय बहुतांश कलाकार अखेरच्या बॉलनंतर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. गौतमी देशपांडे, अभिनय बेर्डे, वनिता खरात, शर्मिष्ठा राऊत या सगळ्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर सेलिब्रेशन करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. हेही वाचा : Virat Kohli T20 Retirement : विश्वविजेतेपदासह विराट कोहलीचा टी२० ला अलविदा, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय म्हणाला? हृषिकेश जोशी यांची पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरची इन्स्टाग्राम स्टोरी अमृता खानविलकर सानिया चौधरीची पोस्ट हेही वाचा : IND vs SA Final: ट्रॉफी हातात घेत राहुल द्रविडची सिंहगर्जना; क्रिकेटप्रेमींनी शांत, संयमी द्रविडचा असा अवतार कधीच पाहिला नसेल, VIDEO व्हायरल दरम्यान, भारताने विश्वचषक जिंकल्याचा आनंद संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येत आहे. गेल्यावर्षी १९ नोव्हेंबरला भारताचा एकदिवसीय विश्वचषकाच्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव झाला होता. त्यामुळे रोहित शर्माचा हा टी-२० संघ यंदा कशी कामगिरी करतो याकडे कोट्यवधी भारतीयांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर भारताचं विजयाचं स्वप्न साकार झालं असून यंदाच्या टी-२० विश्वचषकावर टीम इंडियाने आपलं नाव कोरलं आहे. या सगळ्या खेळाडूंचं भारतात दाखल झाल्यावर जंगी स्वागत करण्यात येणार आहे.