Premium

तेजश्री प्रधानचं शिक्षण किती हे माहीत आहे? आधी करायची ‘या’ क्षेत्रात काम

‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Tejashri Pradhan
तेजश्री प्रधान

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. आज तेजश्रीचा ३५ वा वाढदिवस आहे. आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. पण आपल्या कामाने प्रेक्षकांची नेहमीच वाहवा मिळवणाऱ्या तेजश्रीचं शिक्षण किती हे माहीत आहे? चला जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर त्यानंतर ‘तुझं नि माझं घर श्रीमंताचं’ या मालिकेमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. याचबरोबर ती अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘झेंडा’ या चित्रपटामध्येही झळकली. पण ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने तिला नवी ओळख दिली आणि ती प्रेक्षकांच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनली. पण अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या आधी तेजश्री बँकेत काम करत होती.

आणखी वाचा : “आयुष्यातील सर्वात कठीण काळ…” तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत

जश्री मूळची डोंबिवलीची आहे. डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयामध्ये तिने शालेय शिक्षण घेतलं. तेजश्रीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तिने NIITचा एक कोर्स केला. तिला कौन्सिलर व्हायचं होतं. तिला सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट होता. तिने चौदावीपर्यंत सायकॉलॉजी हा विषय घेऊन शिक्षण घेतलं. पण त्याच वेळी तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

हेही वाचा : “दादा-वहिनी…,” ‘वेड’ला IIFA पुरस्कार मिळाल्यावर दीपशिखा देशमुखची खास पोस्ट, जिनिलीयाने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाली…

तेव्हा शूटिंगमुळे तिला अभ्यासाला जास्त वेळ देता येत नव्हता. त्यामुळे तिने सायकॉलॉजीचं शिक्षण सोडलं आणि अभिनय करण्याला प्राधान्य दिलं. तिने मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयातून पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये पदवी मिळवली. याचबरोबर जर्मन भाषेची आवड असल्याने ती जर्मन भाषाही शिकली. तिने त्या भाषेच्या तीन लेव्हल पूर्ण केल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 12:32 IST
Next Story
Video : ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने हाती घेतलं बसचं स्टेअरिंग, प्रशांत दामले म्हणाले…